केंद्रीय राज्य मंत्र्यांनी घेतली गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची भेट – कृषी क्षेत्राच्या योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा
केंद्रीय राज्य मंत्र्यांनी घेतली गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची भेट – कृषी क्षेत्राच्या योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा गोव्यात कृषी व फलोत्पादन महाविद्यालय स्थापन करण्यास केंद्र सरकार सर्व मदत करण्यास तयार – केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजेकेंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्य मंत्री शोभा करंदलाजे यांनी आज गोवा इथे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या परिसराला भेट दिली. यावेळी, संस्थेचे संचालक, वरिष्ठ अधिकारी आणि शेतकऱ्यांशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. गोव्यात, कृषी आणि फलोत्पादन महाविद्यालय सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यामुळे राज्यात कृषीक्षेत्राचा विकास होईल. केंद्र सरकार पुरस्कृत सराव योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आयसीएआर मध्ये विकसित झालेले धणे भेट म्हणून दिले होते. करंदलाजे यांनी एक रोपटे लावले आणि गोशाळा तसेच चारा छावणीलाही भेट दिली.त्यानंतर, शोभा करंदलाजे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची भेट घेतली. या भेटीत, गोव्यातील कृषीक्षेत्राच्या विविध प...