चौष्टावी कला

तुम्हाला माहिती आहे का की पुरातन काळापासून सौन्दर्य प्रसाधन वापरण्याकडे कल आहे. चित्रकला, नृत्य, नाट्य, संगीत अश्या ६४ कलांमधून एक सौन्दर्य प्रसाधनाची कला आहे. अस मानलं जातं की ही सौन्दर्य प्रसाधन बनवण्याची कला भारत आणि इजिप्त मधून आली आहे. आणि हड्डपा संस्कृतीत ही सौन्दर्य प्रसाधनाचा वापर केल्याचा पुरावा आढळतो. त्याकलातही स्त्रिया आणि पुरुष आपल्या सौदर्याबाबत खूपच जागृत होते. हड्डपा संस्कृतीत डोळ्यात काजल घातलं जायचं आणि तेव्हा काजल बनवण्याची पद्धत एकदम प्रकृतील होती. ह्या सौन्दर्य प्रसाधनाचा वापर फक्त बाहेरील सौंदर्य वाढवण्यासाठीच नाही तर पुण्य, आयुष, आरोग्यम आणि आनंदम याना मिळवण्यासाठी होत होता. मौर्य काळ आणि गुप्त काळात बघितलं तर पौटल्यचं अर्थशास्त्र, वत्सयनच कामसूत्र, कालिदासच शाकुंतलम ह्या सर्व महाकव्यामध्ये पण अस सांगितलंय की त्या काळातही महिला आणि पुरुष सौन्दर्य प्रसाधनाचा वापर करत असे. मालवीकागणीमित्रम मध्ये आलट्टा नावाच्या लाल रंगाबद्दल सांगितलंय ज्याला हिंदीमध्ये आलता म्हणतात. ज्याने स्त्रियांच्या पायाला रंगवले जाते. कथक्क करताना त्या नृत्यांगना पायात आलता लावतात जे त्यांच्या पायाला नाचटम थंड ठेवत. आजही बंगाली लग्नात नवरीच्या पायावर आलता आणि चंदन लावतात. कथकली डान्सर्स त्यांच्या चेहऱ्याला रंगवतात जे एकप्रकारचा विशेषक म्हणजेच शरीर रंगवण्याची कला आहे. पुरातन काळातील अंगराग म्हणजेच चेहऱ्याचा मेकअप त्याकाळात लोधरा पावडर ने चेहरा आणि हलक्या वेगळ्या रंगाने ओठ रंगवले जात. हळद, बेसन, मलई, लोणी या सर्वांना चेहऱ्याचे सौन्दर्य वाढवण्यासाठी वापरत. त्याकाळातही नखांना रंगवणे साधी गोष्ट होती. आणि या कलेत माहीर असणाऱ्यांना नखलेखक म्हंटले जाई. यात काही शंका तर नाहीच की शृंगार आपल्या साठी काही नवीन नाही फरक फक्त एवढाच आज की आधीच्या प्राकृतिक सौन्दर्य प्रसाधनाची जागा आता केमिकल ने भरलेल्या सौन्दर्य प्रसाधनांनी घेतली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"लागिर झालं जी" मालिकेतील कलाकारांच्या जीवाला धोका; खळबळजनक पोस्ट करत दिली माहिती

बहुला येथे बायप संस्थेच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण व वंधत्व शिबीर संपन्न

Indurikar Maharaj On Nilesh Lanke : इंदुरिकर महाराजांचा निलेश लंकेना हत्तीचा उल्लेख करून सल्ला...