पोस्ट्स

औरंगाबाद लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भाजप-सेना युती होणार ? भाजपचे मंत्री व्यासपीठावर असताना 'माझे भावी सहकारी' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं विधान !

इमेज
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहे. आणि याच दौऱ्यामुळे भाजप-सेना युती होणार? अशा चर्चांना उधाण आलंय, त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल मोठं विधान ! उद्धव ठाकरेंनी व्यासपीठावर बोलताना 'व्यासपीठावरील आजी-माजी एकत्र आले तर भावी सहकारी होतील' असं विधान केलंय. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्‍वभूमीवर आज औरंगाबाद  येथील नवीन जिल्हा परिषद इमारतीचं भूमिपूजन केल्यावर व्यासपीठावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे सर्व जण एकाच व्यासपीठावर उपस्थित असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेना-भाजप यांच्यातील युतीच्या चर्चांना आताच कुठे ब्रेक लागला होता, तर आता अशातच उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप-शिवसेना युती होणार ? अशा चर्चांना ऊत आलाय. मुख्यमंत्री ठाकरेंचं नेमकं विधान काय ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या...