World Photography Day : जागतिक फोटोग्राफी दिन का साजरा केला जातो ?

नमस्कार आज आपण बघणार आहोत की जागतिक फोटोग्राफी दिन का साजरा केला जातो ? यामागे नेमके कोणते कारण आहे आणि फोटोग्राफीचा इतिहास नेमका काय आहे ? जगातली पहिली सेल्फी कोणाची आहे ? चला तर मग बघुया फोटोग्राफी दिन साजरा करण्यामागची कारण... १९ ऑगस्ट ला जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो. (19 August Celebrate World Photography Day) यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे जगातल्या प्रत्येक फोटोग्राफर्स ने काढलेल्या फोटोला जगातील फोटो प्रेमींना बघता यावे, आणि फोटोग्राफर्सचं कौतुक व्हावं. या उद्देशाने जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा केला जातो. जागतिक फोटोग्राफी दिन कधी पासून साजरा केला जातो... जागतिक फोटोग्राफी दिवसाची २०१० पासून सुरुवात झाली होती, मात्र यामागचा इतिहास खूप जुनाच आहे. फ्रेंच मधील दोन व्यक्तींनी छायाचित्र प्रक्रिया सुलभ करण्यासाठी 'डॅगुएराटाईप्स' चा शोध लावला. फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्स ने ९ जानेवारी १८३७ साली अधिकृतपणे या दोन व्यक्तींनी शोध लावलेल्या 'डॅगु्यरिओटाइप' चा शोध जाहीर केला. त्या दोन शोध लावणाऱ्या व्यक्तींची नावे 'निसफोर निपसे आणि लुईस डॅगुएरे' अशी होती. हा शोध ज...