पोस्ट्स

उस्मानाबाद लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सासरी जाण्यास केला उशीर, पत्नीचा खून

इमेज
शिराढोण (जि. उस्मानाबाद): माहेरी आलेल्या विवाहितेने सासरी जाण्यास एक दिवस विलंबाची मागणी केली असता पतीने थेट विळ्याने वार करून पत्नीचा खून केला. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली याप्रकरणी शिरढोण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरढोण येथील मारुती माने यांनी जालना जिल्ह्यातील मांजरगाव येथील कृष्णा जाधव याच्याशी त्यांची मुलगी काजल हीचा विवाह करून दिला होता. संसार सुरळीत सूरू असताना मागील सप्टेंबर महिन्यात काजल ही आजारी पडली होती त्यामुळे तिच्या पतीने औषधोपचारासाठी तिला माहेरी सोडले तेव्हापासून ती शिराढोणमध्येच होती. यानंतर २० सप्टेंबर रोजी काजलचा पती कृष्ण हा तिला घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरी शिरढोण येथे आला होता त्यादिवशी मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कृष्णाने सकाळीच निघायचा आग्रह केला होता. तेव्हा काजल व तिची आई यांनी उद्याचा एक दिवस मुक्काम करूयात अशी चर्चा केली. यानंतर शुक्रवारी दुपारी सराफा दुकानातून काही दागिने खरेदी केल्या नंतर कृष्णा व काजल घराकडे परतले तेव्हा घरी कोणी नसल्याने आरोपी कृष्णाने संधी साधत आजच सासरी का नबी येत यावरुन वाद घातला आणि काजल ला स्टीलच्या...

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तात्काळ अतिवृष्टीची मदत द्या देवेंद्र फडणवीस आक्रमक

इमेज
  अतिवृष्टीमुळे उस्मानाबादसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनचे पुराच्या पाण्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झाले असल्याने आज भारतीय जनता पार्टीचे नेते व महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे गेल्या चार दिवसापासून दौऱ्यावर असून ते यवतमाळ ,वाशिम ,हिंगोली ,नांदेड लातूर , या जिल्ह्याची अतिवृष्टीने नुकसान झाले ची पाहणी करून ते आज उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या दाऊतपूर, इर्ला, चिखली, करजखेडा, तेर येथील गावांना भेटी देवून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर त्यांनी लगेच अठरा मिनिटांची पत्रकार परिषद घेतली.त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यातील शेतीची भीषण परिस्थिती  मराठवाड्यामध्ये अतवृष्टी झाली आणि त्यामुळे अनेक ठिक ठिकाणी पूर आल्याने शेतकऱ्याच अनोतान नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी जे बंधाऱ्याचे गेट्स आहेत ते उघडावे लागल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतात व शिवारात सगळीकडे पाणी शिरल्याने एकट्या मराठवाड्यातील प्राथमिक अंदाज नुसार पंचवीस लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र बाध...

दोन्ही विरोधी पक्षनेते आज उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल होणार

इमेज
  देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत .आणि त्यांनी नांदेड, हिंगोली, लातूर जिल्ह्याची अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली .व ते सोमवारी बीड जिल्ह्यातील नुकसाग्रस्त भागाची पाहणी करणार होते. मात्र भारतीय जनता  पार्टीच्या नेत्या व  राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आजारी असल्यामुळे हा दौरा रद्द केला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे.व तो दौरा रद्द करुन  ते आज सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल होत आहेत. उस्मानाबाद जिल्हा दौरा भेटीत ते अतिवृष्टीमुळे व पुराच्या पाण्याने उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेेतकऱ्यांच शेतातील पिक पाण्याखाली जाऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झााल्याने या भागातील गावांना भेटी देणार आहेत. जिल्ह्यात गेले दहा दिवसांपासून अतिवृष्टी होऊन नदीला पुर आल्याने घरांचे झोपड्यांचे,गोट्यांचे ,जनावरांचे ,देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . त...

कळंब तालुक्यातील पुरग्रस्त गावांची केली आमदार राणा पाटील यांनी पहाणी

इमेज
  कळंब तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे व मांजरा डॅम फुलभरल्याने नदीचे पाणी नदी बाहेर पडल्यामुळे आढाळा,आथर्डी, खोदला,सात्रा,भाटसांगवी परिसरातील शेतात नदीचे पाणी शिरल्यामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. म्हणून तुळजापूर मतदार संघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोमवारी दि 27 रोजी सकाळी 12:53 वाजता आढाळा, आथर्डी,खोंदला,भाटसांगवी येथील शेती आणि पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.व शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे येथील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन काढायला आलेले असताना त्यात नदीचे पाणी जाऊन त्याच्यावर गाळ बसला असुन ती सोयाबीन भुईसपाट झाले आहे व कापसाच्या पिकात पाणी शिरल्यामुळे कापुस या पिकाच देखील या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. याचीच पहाणी करण्यासाठी आलेले तुळजापूर मतदार संघाचे चे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुर ग्रस्त गावातील नुकसानीची स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आमदार पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली व त्यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न अडचणी या विषयी विचारले असता तेथील शेतकऱ्यांनी प्रशासनाने पंचनाम...

अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या 'ओ शेठ' गाण्याची चोरी, गायकानेचं गाणं चोरल्याचा आरोप ?

इमेज
सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी कोण हिरो होईल आणि कधी कोण झिरो होईल ते सांगता येत नाही, याचं कारण म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार गाणं ओ शेठ तुम्ही नादच केलय थेट ! हे गाणं आता चोरल्याचा गीतकार, संगीतकार आणि निर्माते संध्या केशे आणि प्रनिकेत खुणे यांनी गायकानेच आपलं गाणं चोरल्याचा आरोप केलाय. ओ शेठ तुम्ही नादच केलय थेट ह्या गाण्याचा व्हाट्सअप, फेसबुक, यूट्यूबसह इंस्टाग्राम वर ही ट्रेंड पाहायला मिळाला. मराठीतल हे गाणं अवघ्या काही दिवसात कोटींच्या घरात व्ह्यूज मिळवणार गाणं ठरलं. या गाण्याने प्रत्येकालाच शेठ करून सोडलय. संपूर्ण राज्यात व्हायरल होणार हे गाणं आता वादाच्या भोवऱ्यात गुंतलय. ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट या गाण्याने या गाण्याच्या संगीतकार, गीतकार व निर्माते यांना प्रसिद्धी मिळवून दिली खरी ; पण गाण्याच्या मालकीवरून आता वाद निर्माण झालाय. ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट या गाण्याच्या मालकी वरून हा वाद आता रंगलाय. गाण्याचे गायक उमेश गवळी यांनी हे गाणं आपल्याच मालकीच असल्याचे म्हणून डीजे प्रनिकेत ऑफिशियल यूट्यूब चैनल वर असलेल्या या गाण्यात आपले हक्क दाखवून हे गाणं युट्युब वरून ...