दोन्ही विरोधी पक्षनेते आज उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल होणार
देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत .आणि त्यांनी नांदेड, हिंगोली, लातूर जिल्ह्याची अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली .व ते सोमवारी बीड जिल्ह्यातील नुकसाग्रस्त भागाची पाहणी करणार होते. मात्र भारतीय जनता पार्टीच्या नेत्या व राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आजारी असल्यामुळे हा दौरा रद्द केला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे.व तो दौरा रद्द करुन
ते आज सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल होत आहेत. उस्मानाबाद जिल्हा दौरा भेटीत ते अतिवृष्टीमुळे व पुराच्या पाण्याने उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेेतकऱ्यांच शेतातील पिक पाण्याखाली जाऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झााल्याने या भागातील गावांना भेटी देणार आहेत.
जिल्ह्यात गेले दहा दिवसांपासून अतिवृष्टी होऊन नदीला पुर आल्याने घरांचे झोपड्यांचे,गोट्यांचे ,जनावरांचे ,देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . त्याचबरोबर शेतातील सोयाबीन, कापुस, मूग उडीद ,तूर,ऊस ह्या हि पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने. याच झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी मोठा अडचणीत आला असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी दोन्ही ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस आणि प्रवीण दरेकर आज सोमवारी जिल्ह्यात येत आहेत ते दोघेही लातूरवरून येत असून, उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथे १२:२० मिनिटांनी त्यांचे आगमन होणार आहे.
व ते तिथून दुपारी. १.१५ मिनिटांनी. - दाऊतपूर येथील नुकसानग्रस्त भागाला भेट देतील त्या नंतर २:१५ मिनिटांनी तेर येथील नुकसानीची पाहणी करतील.व नंतर
३:३० मिनिटांनी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. व पढे४:२० मिनिटांनी कळंब तालुक्यातील आवाडशिरपूरा येथे आगमन होईल व तेथील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करतील. नंतर५:१० मिनिटांनी वाकडी ई,सौंदना येथील नुकसानीची पाहणी करतील . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारे असेल दोन्ही विरोधी पक्ष नेते यांचा दौरा.दोन्ही विरोधी पक्षनेते यांचा पाहणी दौरा संपल्यानंतर दोन्ही सभागृहात विषय सरकारपुढे मांडतील का? आणि त्यातून मराठवाड्यातील शेतकऱ्याला न्याय मिळेल का ? असा प्रश्न येथील शेतकर्यांना पडला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा