भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजर

 भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र मंडळातर्फे 9 ते 16 ऑक्टोबर 2021 या कालावधीत राष्ट्रीय टपाल सप्ताह आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

बर्न येथे मुख्यालय असलेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियन या संघटनेच्या  स्थापनेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी दर वर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिवस साजरा केला जातो. भारतीय टपाल मंडळाच्या वतीने 9 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर 2021 या कालावधीत राष्ट्रीय टपाल सप्ताह आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल एच.सी.अग्रवाल यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेचे आयोजन केले होते. राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांबद्दल  तसेच टपाल विभागाच्या विविध सेवांबाबत महाराष्ट्र मंडळाने  केलेल्या कामगिरीची माहिती यावेळी देण्यात आली. टपाल खात्याच्या अर्थ विभागाचे महाव्यवस्थापक विजय कुमार तसेच  महाराष्ट्र विभागाच्या टपाल सेवा संचालक कैय्या अरोरा हे  देखील या वार्ताहर परिषदेला उपस्थित होते.

राष्ट्रीय टपाल सप्ताह आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांमध्ये महाराष्ट्र मंडळाने खालील कार्यक्रमांचे आयोजन केले:

 11 ऑक्टोबर 2021 रोजी बँकिंग दिवस साजरा या दिवशी 254 ठिकाणी आर्थिक समावेशकता मेळ्यांचे

  • या दिवशी 254 ठिकाणी आर्थिक समावेशकता मेळ्यांचे आयोजन करण्यात आले 
  • बँकिंग दिवसानिमित्त 49,690 पीओएसबी खाती आणि 16,139 एसएसए खाती उघडण्यात आली

  • 12 ऑक्टोबर 2021 रोजी टपाल जीवन विमा दिवसाचे आयोजन
महाराष्ट्र मंडळात 17,631 टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा पॉलिसी काढण्यात आल्या (लक्ष्य 12,500)
टपाल जीवन विमा दिनानिमित्त देशभरात 1.39 लाखाहून पॉलिसी काढण्यात आल्या.
या दिवशी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये 633 मेळ्यांचे आयोजन करण्यात आले.
विमा न घेतलेल्या अनेक लोकांना विम्याच्या छत्राखाली आणण्यात आले (नागरिकांचे विमा संरक्षण वाढविण्यासाठी प्रत्येक महिन्यात दोनदा विशेष अभियाने देखील चालविण्यात येतात)

13 ऑक्टोबर 2021 रोजी टपाल तिकीट दिवस साजरा


मंडळ कार्यालयात 13 ऑक्टोबर 2021 रोजी भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा 75 वर्षांचा प्रवास दर्शविणारे टपाल तिकिटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.भारताची 1947 ते 2021 या कालावधीत झालेली प्रगती या टपाल तिकिटांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून दर्शविण्यात आली.
टपाल तिकीट संग्रहावर आधारित चर्चासत्र/प्रश्नमंजुषा/स्पर्धा आयोजित करण्यात आली.
नवी 850 टपाल तिकीट संग्राहक खाती उघडण्यात आली.
उमाजी नाईक (पुणे), पुरुषोत्तम काकोडकर (गोवा), मोहन रानडे (गोवा), मणीबेन पटेल (मुंबई) या अप्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिकांवर आधारित विशेष टपाल तिकिटांचे अनावरण करण्यात आले.
 14 ऑक्टोबर 2021 रोजी व्यवसाय विकास दिवसाचे आयोजन

या दिवशी 385 विशेष शिबिरे/ मेळ्यांचे आयोजन करण्यात आले आणि आधार क्रमांकाच्या माध्यमातून 15,389 व्यवहार करण्यात आले.
 16 ऑक्टोबर 2021 ला टपाल दिवसाचे आयोजन

विविध प्रादेशिक विभागांमध्ये ग्राहकांना भारतीय टपाल विभागाच्या नव्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी तसेच त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी ग्राहक भेटींचे आयोजन करून त्यांचे प्रतिसाद जाणून घेण्यात आले.
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या 75 व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची गाथा सांगणारा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला.
टपाल विभागातर्फे मुख्य ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाबाबत माहिती देणारे फलक लावण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"लागिर झालं जी" मालिकेतील कलाकारांच्या जीवाला धोका; खळबळजनक पोस्ट करत दिली माहिती

बहुला येथे बायप संस्थेच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण व वंधत्व शिबीर संपन्न

Indurikar Maharaj On Nilesh Lanke : इंदुरिकर महाराजांचा निलेश लंकेना हत्तीचा उल्लेख करून सल्ला...