OBC आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावे लागले तरी घ्यावे: पंकजाताई मुंडे

  ओबीसी ची झालेली हानी भयंकर आहे. यात मार्ग निघालाच पाहीजे. 


OBC ची झालेली हानी भयंकर आहे.यात मार्ग निघालाच पाहिजे. विषय राजकारणाचा नाही. विषय अस्तित्त्वाचा आहे.दोषा रोप नको मार्ग काढावा.त्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावे लागले तरी घ्या अशी मागणी करणारी ट्विट पोस्ट भाजपा च्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी केल आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देता येणार नाही असा स्पष्ट आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. तसेच राज्य सरकारच्या आदेशाला न्यायालयाने पुढील सुनावणी पर्यंत स्थगिती दिली आहे. राज्य सरकारच्या ओबीसी च्या राजकीय आरक्षणाला न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश सम्मानीय सुप्रीम कोर्टाकडून स्थगित झाला आहे, ऑर्डर अजून प्राप्त नाही पण ट्रिपल टेस्ट नाही झाली हा उल्लेख आहे. या संदर्भात सर्व अभ्यासकांनी एकत्र येऊन मार्ग काढणे आवश्यक आहे. विशेष अधिवेशन घ्यावे लागले तरीही घ्यावे. अस पंकजाताई मुंडे यांनी ट्विट पोस्ट मध्ये म्हटले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"लागिर झालं जी" मालिकेतील कलाकारांच्या जीवाला धोका; खळबळजनक पोस्ट करत दिली माहिती

बहुला येथे बायप संस्थेच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण व वंधत्व शिबीर संपन्न

Indurikar Maharaj On Nilesh Lanke : इंदुरिकर महाराजांचा निलेश लंकेना हत्तीचा उल्लेख करून सल्ला...