चौष्टावी कला
तुम्हाला माहिती आहे का की पुरातन काळापासून सौन्दर्य प्रसाधन वापरण्याकडे कल आहे. चित्रकला, नृत्य, नाट्य, संगीत अश्या ६४ कलांमधून एक सौन्दर्य प्रसाधनाची कला आहे. अस मानलं जातं की ही सौन्दर्य प्रसाधन बनवण्याची कला भारत आणि इजिप्त मधून आली आहे. आणि हड्डपा संस्कृतीत ही सौन्दर्य प्रसाधनाचा वापर केल्याचा पुरावा आढळतो. त्याकलातही स्त्रिया आणि पुरुष आपल्या सौदर्याबाबत खूपच जागृत होते. हड्डपा संस्कृतीत डोळ्यात काजल घातलं जायचं आणि तेव्हा काजल बनवण्याची पद्धत एकदम प्रकृतील होती. ह्या सौन्दर्य प्रसाधनाचा वापर फक्त बाहेरील सौंदर्य वाढवण्यासाठीच नाही तर पुण्य, आयुष, आरोग्यम आणि आनंदम याना मिळवण्यासाठी होत होता. मौर्य काळ आणि गुप्त काळात बघितलं तर पौटल्यचं अर्थशास्त्र, वत्सयनच कामसूत्र, कालिदासच शाकुंतलम ह्या सर्व महाकव्यामध्ये पण अस सांगितलंय की त्या काळातही महिला आणि पुरुष सौन्दर्य प्रसाधनाचा वापर करत असे. मालवीकागणीमित्रम मध्ये आलट्टा नावाच्या लाल रंगाबद्दल सांगितलंय ज्याला हिंदीमध्ये आलता म्हणतात. ज्याने स्त्रियांच्या पायाला रंगवले जाते. कथक्क करताना त्या नृत्यांगना पायात आलता लावतात जे त्...