कळंब तालुक्यातील पुरग्रस्त गावांची केली आमदार राणा पाटील यांनी पहाणी


 


कळंब तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे व मांजरा डॅम फुलभरल्याने नदीचे पाणी नदी बाहेर पडल्यामुळे आढाळा,आथर्डी, खोदला,सात्रा,भाटसांगवी परिसरातील शेतात नदीचे पाणी शिरल्यामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. म्हणून तुळजापूर मतदार संघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोमवारी दि 27 रोजी सकाळी 12:53 वाजता आढाळा, आथर्डी,खोंदला,भाटसांगवी येथील शेती आणि पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.व
शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे येथील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन काढायला आलेले असताना त्यात नदीचे पाणी जाऊन त्याच्यावर गाळ बसला असुन ती सोयाबीन भुईसपाट झाले आहे व कापसाच्या पिकात पाणी शिरल्यामुळे कापुस या पिकाच देखील या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. याचीच पहाणी करण्यासाठी आलेले तुळजापूर मतदार संघाचे चे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुर ग्रस्त गावातील नुकसानीची स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आमदार पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली व त्यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न अडचणी या विषयी विचारले असता तेथील शेतकऱ्यांनी प्रशासनाने पंचनामे केले व पिक विमा कंपनीच्या माणसांनी देखील पंचनामे केले परंतु अद्यापही काहीही माहिती आम्हाला मिळू शकली नाही असे शेतकऱ्यांनी आमदार यांना सांगितले व शेतकऱ्यांनी पुढे बोलत असताना ई पीक पाहणी विषयी ऑनलाइन होतं नाही तर काही जणांना ऑनलाईन करता येत नाही अशी खंत व्यक्त केली व त्यावर बोलत असताना आमदार पाटील शेतकऱ्यांना बोलताना म्हणाले की ज्या व्यक्तीचं ऑनलाईन इ पिक होत नाही त्यांनी आपला अर्ज तहसील कार्यालयात लेखी स्वरुपात दाखल करा असे आमदार यांनी शेतकऱ्यांना सांगितले व पुढे आमदार पुढील पूरग्रस्त गावांना भेट देण्यास निघून गेले त्यांच्यासमवेत कळंब भाजपा तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे, भाजपा तालुका महीला उपाध्यक्षा सौ कविता जगताप, उपसरपंच शिवाजी शिंदे, बाजारात समितीच संचालक अरुण काका चौधरी, गोविंद अडसूळ, स्वानंद पाटील, अण्णासाहेब शिंदे, रामदास इंगळे, अक्षय हगारे, विकास वायसे, कल्याण हगारे, शरद घोडके, राहुल हगारे, किशोर हगारे, आण्णासाहेब आरकडे, प्रकाश गाढवे , कैलास वायसे, संतोष वायसे, संदीप बावणे, आबासाहेब हगारे सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'निलिट' मध्ये 25 नोव्हेंबर रोजी मोफत भव्य रोजगार मेळावा.

हेलिकॉप्टर अपघात बिपिन रावत यांच्यासह पत्नी मधुलिका रावत यांचे देखील अपघाती निधन

चारोळ्यातुन पंकजा मुंडेंचा भाजपाला घरचा आहेर