सासरी जाण्यास केला उशीर, पत्नीचा खून
शिराढोण (जि. उस्मानाबाद): माहेरी आलेल्या विवाहितेने सासरी जाण्यास एक दिवस विलंबाची मागणी केली असता पतीने थेट विळ्याने वार करून पत्नीचा खून केला. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली याप्रकरणी शिरढोण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरढोण येथील मारुती माने यांनी जालना जिल्ह्यातील मांजरगाव येथील कृष्णा जाधव याच्याशी त्यांची मुलगी काजल हीचा विवाह करून दिला होता. संसार सुरळीत सूरू असताना मागील सप्टेंबर महिन्यात काजल ही आजारी पडली होती त्यामुळे तिच्या पतीने औषधोपचारासाठी तिला माहेरी सोडले तेव्हापासून ती शिराढोणमध्येच होती. यानंतर २० सप्टेंबर रोजी काजलचा पती कृष्ण हा तिला घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरी शिरढोण येथे आला होता त्यादिवशी मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कृष्णाने सकाळीच निघायचा आग्रह केला होता. तेव्हा काजल व तिची आई यांनी उद्याचा एक दिवस मुक्काम करूयात अशी चर्चा केली. यानंतर शुक्रवारी दुपारी सराफा दुकानातून काही दागिने खरेदी केल्या नंतर कृष्णा व काजल घराकडे परतले तेव्हा घरी कोणी नसल्याने आरोपी कृष्णाने संधी साधत आजच सासरी का नबी येत यावरुन वाद घातला आणि काजल ला स्टीलच्या पाईप ने मारहाण करत विळ्याने वार करून तिचा जागीच अंत केला. यानुसार आरोपी कृष्णावर शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला शनिवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात अली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा