अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या 'ओ शेठ' गाण्याची चोरी, गायकानेचं गाणं चोरल्याचा आरोप ?



सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी कोण हिरो होईल आणि कधी कोण झिरो होईल ते सांगता येत नाही, याचं कारण म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार गाणं ओ शेठ तुम्ही नादच केलय थेट ! हे गाणं आता चोरल्याचा गीतकार, संगीतकार आणि निर्माते संध्या केशे आणि प्रनिकेत खुणे यांनी गायकानेच आपलं गाणं चोरल्याचा आरोप केलाय.

ओ शेठ तुम्ही नादच केलय थेट ह्या गाण्याचा व्हाट्सअप, फेसबुक, यूट्यूबसह इंस्टाग्राम वर ही ट्रेंड पाहायला मिळाला. मराठीतल हे गाणं अवघ्या काही दिवसात कोटींच्या घरात व्ह्यूज मिळवणार गाणं ठरलं. या गाण्याने प्रत्येकालाच शेठ करून सोडलय. संपूर्ण राज्यात व्हायरल होणार हे गाणं आता वादाच्या भोवऱ्यात गुंतलय.

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट या गाण्याने या गाण्याच्या संगीतकार, गीतकार व निर्माते यांना प्रसिद्धी मिळवून दिली खरी ; पण गाण्याच्या मालकीवरून आता वाद निर्माण झालाय. ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट या गाण्याच्या मालकी वरून हा वाद आता रंगलाय.

गाण्याचे गायक उमेश गवळी यांनी हे गाणं आपल्याच मालकीच असल्याचे म्हणून डीजे प्रनिकेत ऑफिशियल यूट्यूब चैनल वर असलेल्या या गाण्यात आपले हक्क दाखवून हे गाणं युट्युब वरून मालकी टाकून (कॉपीराईट द्वारा) डिलीट केलय.

म्हणजेच युट्युब वर असलेले या गाण्यात गायक उमेश गवळींनी मालकी हक्क दाखवले. आणि सोबतच गायक उमेश गवळीनीं गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि निर्माते संध्या केशे आणि डीजे प्रनिकेत खुने यांच्या विरोधात पुण्याच्या बिबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

चोर तर चोर शिर चोर, चोराच्या उलट्या बोंबा अशा म्हणी ह्या खऱ्या होत असतात. आणि गायक उमेश गवळी सांगत फिरतोय की हे गाणं माझंच आहे. सगळीकडे मेसेज करतोय हे गाणं माझंच माझंच आहे. सोबतच पोलिसात तक्रार देतानाही गायक उमेश गवळीने गाणं माझंच असल्याचा दावा केलाय. अशी प्रतिक्रिया संध्या केशेंनी दिलीय.

उमेश गवळी ने जे काही केलं ते सगळं चुकीचं केलंय, गाण्याचा मालक मीच आहे असं सगळीकडे सांगत फिरतोय तर संध्या प्रनिकेत कोण आहे ? असा सवाल डीजे प्रनिकेत ने उपस्थित केला आहे.

आम्ही जे बनवलं त्या गाण्यातील काही ओळी आज खऱ्या ठरल्या आहेत. धोकेबाजांना दूर आता केले या ! कुणावर माझा भरोसा नाही अगदी ह्या ओळी जशास तशा सत्यात उतरल्या आहेत. आता आमचा आमच्या गायकावर विश्वास राहिला नसल्याचेही प्रनिकेतने सांगितले.

उमेश गवळी ने दिलेली कॉपीराइट स्ट्राइक काढावीत आणि त्याने लोकांना एवढेच सांगाव की मी गाण्याचा गायक आहे. आम्ही उमेश गवळीना क्रेडिट देतोच आहे. आणि प्रेक्षकांनी आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या पाठीशी उभ रहावं. अशी विनंती गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि निर्माते संध्या केशे आणि प्रनिकेत खुणे आता करताना दिसत आहे.

आता खरी गरज आहे पोलिस प्रशासनाने याची दखल घेऊन यात लक्ष घालावं. आणि खऱ्या मालकाला त्याचं गाणं परत मिळवून द्यावं अशी अपेक्षा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"लागिर झालं जी" मालिकेतील कलाकारांच्या जीवाला धोका; खळबळजनक पोस्ट करत दिली माहिती

बहुला येथे बायप संस्थेच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण व वंधत्व शिबीर संपन्न

Indurikar Maharaj On Nilesh Lanke : इंदुरिकर महाराजांचा निलेश लंकेना हत्तीचा उल्लेख करून सल्ला...