भाजप-सेना युती होणार ? भाजपचे मंत्री व्यासपीठावर असताना 'माझे भावी सहकारी' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं विधान !


औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहे. आणि याच दौऱ्यामुळे भाजप-सेना युती होणार? अशा चर्चांना उधाण आलंय, त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल मोठं विधान !
उद्धव ठाकरेंनी व्यासपीठावर बोलताना 'व्यासपीठावरील आजी-माजी एकत्र आले तर भावी सहकारी होतील' असं विधान केलंय.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्‍वभूमीवर आज औरंगाबाद  येथील नवीन जिल्हा परिषद इमारतीचं भूमिपूजन केल्यावर व्यासपीठावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे सर्व जण एकाच व्यासपीठावर उपस्थित असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.
शिवसेना-भाजप यांच्यातील युतीच्या चर्चांना आताच कुठे ब्रेक लागला होता, तर आता अशातच उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप-शिवसेना युती होणार ? अशा चर्चांना ऊत आलाय.

मुख्यमंत्री ठाकरेंचं नेमकं विधान काय ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरवातीलाच 'व्यासपीठावरील उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी' असं सूचक विधान केल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय आणि भाजप-शिवसेना युतीच्या चर्चासुद्धा रंगू लागल्याय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या याच वक्तव्यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलीय.

काय म्हणाले रावसाहेब दानवे !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी भाजप-शिवसेनेच्या युतीबद्दल सूचक विधान केलंय. ते म्हणाले'एकेकाळी आम्ही पंचवीस-तीस वर्षे एकत्रच होतो, राजकारणात केव्हा काहीही होऊ शकत असं काही ठरलेलं नसतं. असं कधी वाटलं नाही की, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येईल किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येईल. राजकारणात सगळ्या शक्यता गृहीत धरून असतात, तेव्हा मुख्यमंत्री महोदय जे बोलले ते मी पण बोललोय त्यामध्ये काही नवीन वाटत नाही आम्हाला' असं मत रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर व्यक्त केलं.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"लागिर झालं जी" मालिकेतील कलाकारांच्या जीवाला धोका; खळबळजनक पोस्ट करत दिली माहिती

बहुला येथे बायप संस्थेच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण व वंधत्व शिबीर संपन्न

Indurikar Maharaj On Nilesh Lanke : इंदुरिकर महाराजांचा निलेश लंकेना हत्तीचा उल्लेख करून सल्ला...