हेलिकॉप्टर अपघात बिपिन रावत यांच्यासह पत्नी मधुलिका रावत यांचे देखील अपघाती निधन
भारतीय लष्कराचे सी डी एस जनरल बिपिन रावत सोबत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे देखील अपघाती निधन झाले आहे.
भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत त्यांच्यासह 14 जणांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर आज दुपारी १२ च्या सुमारास तमिळनाडूच्या उटी कुन्नूर डोंगराळ भागांमध्ये कोसळल्या नंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले . होते मात्र या अपघातात सी डी एस जनरल बिपिन रावत हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .मात्र त्यांचा उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.व त्यात यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे देखील निधन झाले आहे.
रावत यांनी आपल्या आयुष्यातील 37 वर्ष लष्करासाठी समर्पित केले होते .
दलबीर सिंह सुहाग हे 31 डिसेंबर 2016 लष्कर प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी बिपिन रावत यांची नियुक्ती करण्यात आली होती.
बिपिन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत त्यांची एक सप्टेंबर 2016साली भारतीय सेनेच्या उपप्रमुख पदी नियुक्ती झाली होती.
रावत यांचे वडील ही भारतीय सेनेच्या लेफ्टनंट जनरल एल एस रावत हे सेनेच्या उपप्रमुख पदावर नियुक्त झाले होते.
व बिपिन रावत यांना उत्कृष्ट काम केल्याने परमवीर चक्र सेवा पदक,अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, सेना पदक, युद्ध सेवा पदक, उत्तम योद्धा सेवा पदक आशा अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा