'निलिट' मध्ये 25 नोव्हेंबर रोजी मोफत भव्य रोजगार मेळावा.

औरंगाबाद:-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रौद्योगिकी संस्थान (निलिट)

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन

यांच्या संयुक्त विद्यमाने 

 25 नोव्हेंबर २०२१ रोजी , १८ ते ३५ वयोगटातील बेरोजगार युवक व युवतींसाठी 

 भव्य रोजगार मेळाव्याचे चे आयोजन करण्यात आले आहे.

 


 शुक्रवारी 19 नोव्हेंबर पासून या रोजगार मेळाव्याचे मोफत नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

 

रोजगार मेळाव्यामध्ये आपले आधार कार्ड, बायोडेटा आणि गुणपत्रक घेऊन येणे आवश्यक आहे.


या रोजगार मेळाव्यातून मिळणाऱ्या नोकरीसाठी कुठल्याही प्रकारची फि घेतली जाणार नाही.


या रोजगार मेळाव्यामध्ये औरंगाबाद पुणे मुंबई येथील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून कला वाणिज्य विज्ञान आयटीआय डिप्लोमा डिग्री इंजिनिअरिंग या सर्व बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

या रोजगार मेळाव्यामध्ये एक हजार अधिक जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार केली जाणार आहे.

जास्तीत जास्त गरजू व बेरोजगार विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेलिकॉप्टर अपघात बिपिन रावत यांच्यासह पत्नी मधुलिका रावत यांचे देखील अपघाती निधन

चारोळ्यातुन पंकजा मुंडेंचा भाजपाला घरचा आहेर