पंकजा मुंडेंच्या ट्विटची घेतली गेली तातडीने दखल
बीड दिनांक २१ पैठण - पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग ७५२ या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे पडलेल्या भेगा बुजविण्याचे आणि दुरूस्तीचे काम पाटोदा नजीक आजपासून हाती घेण्यात आले आहे . भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी यासंदर्भात निकृष्ट कामाचे फोटोसह ट्विट केल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याची तातडीने दखल घेतली होती . पैठण - पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग ७५२ ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत . माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांना पत्र लिहीनच . त्यांनाही हे अजिबात चालणार नाही.
तात्काळ दखल घेतली जाईल असं ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी नुकतच केलं होतं शिवाय सोबत त्याचा एक फोटो देखील पोस्ट केला होता . या ट्वीटला लगेचच नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून उत्तर देण्यात आलं होतं आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते . दरम्यान , पाटोदा शहराच्या नजीक या खराब झालेल्या रस्त्यांवरील भेगा बुजविण्याचे व दुरूस्तीचे काम कत्राटदाराने आजपासून सुरू केले आहे.
Good Baji
उत्तर द्याहटवा