"लागिर झालं जी" मालिकेतील कलाकारांच्या जीवाला धोका; खळबळजनक पोस्ट करत दिली माहिती
छोट्या पडद्यावरील 'लागिर झालं जी' ही सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील गेल्या दोन दिवसापूर्वी चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे नीतीश चव्हाण. या मालिकेतील अभिनेता डॉ. ज्ञानेश माने यांचे अपघाती निधन झालं. मात्र सोशल मीडियावर या कलाकार ऐवजी नीतीश चव्हाण (अज्या) चा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊन नितीशचाच अपघाती मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे नितीश चव्हाण (अज्या) च्या चाहत्या वर्गाकडून दुःख व्यक्त केलं जात होते. मात्र याबाबत काही वेळातच खुलासा होऊन सत्य समोर आलं आणि नेमकं कोणाचा अपघाती मृत्यू झाला हे स्पष्ट झालं. आणि नीतीच्या चाहत्यानी दिलासा व्यक्त केला.
नीतीश चव्हाण 'लागिर झालं जी' या मालिकेतील अज्याच्या भूमिकेने लाखो लोकांची मनोज जिंकली आणि त्यांच्या मनात जागा निर्माण केली. आणि अज्याच्या भूमिकेमुळे त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला.
आता अशातच नितीश चव्हाणने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक पोस्ट शेअर केली आहे. आणि हिच पोस्ट बघून त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. या पोस्टमध्ये नितीश चव्हाणने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये नीतीश एक फलक घेऊन उभा आहे. आणि फलकावर"आम्ही पळून जाऊन लग्न केलं आहे... आमच्या जीवाला धोका आहे" असं लिहिलं आहे. हा फोटो शेअर करत "मी आत्ता पर्यंत सोशल मीडियावर माझ्या रिलेशनशिप बद्दल काहीही सांगितलं नाही. कारण घरच्यांचा विरोध होता आणि अजूनही आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. कॉलेज आम्ही पळून जाऊन लग्न केलयं.
मला खरंतर हे असं सगळ्यांसमोर सांगायचं नव्हतं पण कालपासून तिच्या घरून मला वारंवार धमक्या येत आहेत म्हणून मला हे सांगावं लागतंय" असे कॅप्शन नितीश ने त्या पोस्ट च्या फोटोला दिले आहे.
नीतीश चव्हाण ची हि पोस्ट पाहून चाहत्यांना चांगलाच धक्का बसलाय, नीतीश चव्हाण ची हि पोस्ट पाहून चाहते वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहे. तर काही पोस्ट बघून नीतीशच्या आगामी प्रोजेक्टचं प्रमोशन असल्याचं सांगत आहे तर कोणाला ही पोस्ट नेमकं काय आहे हे कळेना झालं. मात्र या पोस्ट बद्दल अभिनेता नीतीश चव्हाण (अज्या) च काहीही आणि याबद्दल अजून कुठलाही खुलासा केलेला नाही.
या पोस्ट खाली अनेक कमेंट आले आहेत. नक्की मानसी आणि नितीश यांचं लग्न आहे का ? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे एखाद्या नवीन प्रोजेक्टमध्ये आणि माणसे एकत्र दिसणार का ? असा अंदाज देखील काही जण व्यक्त करताना दिसत आहे. मात्र ही पोस्ट नक्की काय आहे हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा