केंद्रीय राज्य मंत्र्यांनी घेतली गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची भेट – कृषी क्षेत्राच्या योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

केंद्रीय राज्य मंत्र्यांनी घेतली गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची भेट – कृषी क्षेत्राच्या योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा


गोव्यात कृषी व फलोत्पादन महाविद्यालय स्थापन करण्यास केंद्र सरकार सर्व मदत करण्यास तयार – केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजेकेंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्य मंत्री शोभा करंदलाजे यांनी आज गोवा इथे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या परिसराला भेट दिली. यावेळी, संस्थेचे संचालक, वरिष्ठ अधिकारी आणि शेतकऱ्यांशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. गोव्यात, कृषी आणि फलोत्पादन महाविद्यालय सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यामुळे राज्यात कृषीक्षेत्राचा विकास होईल. केंद्र सरकार पुरस्कृत सराव योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आयसीएआर मध्ये विकसित झालेले धणे भेट म्हणून दिले होते.


करंदलाजे यांनी एक रोपटे लावले आणि गोशाळा तसेच चारा छावणीलाही भेट दिली.त्यानंतर, शोभा करंदलाजे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची भेट घेतली. या भेटीत, गोव्यातील कृषीक्षेत्राच्या विविध पैलूंवर चर्चा केली. गोव्यात, एकात्मिक कृषी महाविद्यालय सुरु करण्याविषयी देखील यावेळी चर्चा झाली. यामुळे कृषी क्षेत्रातील विविध विषयांमधील समन्वय वाढेल, असे ते म्हणाले. गोव्यात अपेडा कार्यालय सुरु करण्याबाबत तसेच सेंद्रिय शेतीबाबतही या भेटीत चर्चा झाली. तसेच, कृषी पायाभूत निधीविषयी आणि त्याचा राज्यासाठी काय उपयोग करून घेता येईल, याविषयी चर्चा झाली.


मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीबद्दल, त्यांचे आभार मानले.  गोव्यात, एमएसएमईक्षेत्राला पाठबळ देण्यासाठी गोव्याने, RXILहे पोर्टल सुरु केले असून, त्यामार्फत एमएसएमई कंपन्यांची पेमेंट केली जात आहेत. असे त्यांनी सांगितले.केंद्राच्या  ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ योजनेच्या धर्तीवर, गोव्यातही ‘एक तालुका, एक उत्पादन’ योजना सुरु केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  मत्स्यपालन क्षेत्रातली निर्यात वाढवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.शोभा करंदलाजे या दो दिवसांच्या गोवा दौऱ्यावर असून, आज त्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागातील कामाचा आढावा घेणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"लागिर झालं जी" मालिकेतील कलाकारांच्या जीवाला धोका; खळबळजनक पोस्ट करत दिली माहिती

बहुला येथे बायप संस्थेच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण व वंधत्व शिबीर संपन्न

Indurikar Maharaj On Nilesh Lanke : इंदुरिकर महाराजांचा निलेश लंकेना हत्तीचा उल्लेख करून सल्ला...