व्हायरल व्हिडिओ | औरंगाबाद मध्ये पुराच्या पाण्यात विहीर वाहून जातानाचा थरारक प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय !

 

     औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकाचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी दुकानात पाणी शिरले, मात्र आता एक औरंगाबाद जिल्ह्यातील वेगळीच घटना समोर आलीय. शिवना नदीला आलेल्या पुरामुळे चक्क शेतकऱ्याची विहीरच गेली वाहून...

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खूप दिवसानंतर सुरू झालेल्या जोरदार पावसाने हैदोस घातलाय, कुठे पूल खचले, तर कुठे घरा-दुकानात पाणी शिरले, तर कुठे शेतातील पिकाचे नुकसान झालंय.

पण आता अशातच एक धक्कादायक घटना समोर आली औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शिरसगावात चक्क एका शेतकऱ्याची विहीरच वाहून जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.


पुरात चक्क विहिरच गेली वाहून

औरंगाबाद मध्ये सुरू असलेला पाऊस हा चांगलाच बरसल्याने औरंगाबाद जिल्ह्यात ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली.

या जोरदार पावसामुळे नदी, नाले आणि तलाव पूर्ण क्षमतेने भरले आणि शिवना नदीला तर पुरच आलाय. शिवना नदीला पूर आल्याने गंगापुर तालुक्यातील शिरसगाव या गावातील किसन देविदास काळे, गोरख काळे यांची विहीर नदीच्या पात्रात वाहून गेली.


विहीर वाहून जातानाचा प्रसंग कॅमेऱ्यात कैद 

औरंगाबाद जिल्ह्यातील शिवना नदीला आलेल्या पुरामुळे चक्क एक विहीरच नदीच्या पुरात वाहून गेली. ही विहीर नदीकाठी होती. पुराच्या पाण्याने विहिरीची संपूर्ण नासधूस होताना व्हायरल व्हिडिओ मध्ये पाहायला मिळतं. पूर्ण विहिर नदीपात्रात वाहून जात असतानाचा संपूर्ण प्रसंग मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालाय.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'निलिट' मध्ये 25 नोव्हेंबर रोजी मोफत भव्य रोजगार मेळावा.

हेलिकॉप्टर अपघात बिपिन रावत यांच्यासह पत्नी मधुलिका रावत यांचे देखील अपघाती निधन

चारोळ्यातुन पंकजा मुंडेंचा भाजपाला घरचा आहेर