अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा व तातडीने मदत द्या भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्र्यांना निवेदन

 


मागच्या तीन चार दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीने उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे व घराचे नुकसान झाल्याने आज पालक मंत्री उस्मानाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आल्याने आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व  भाजपचे नेते व आमदार राणाजगजितसिंह पाटील व भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार आज पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले .त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे निवेदन दिल्यानंतर काही वृत्तवाहिनीशी बोलत होते ‌.त्यात मागच्या तीन-चार दिवसांपासून प्रचंड अतिवृष्टीने जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. व खूप मोठ्या प्रमाणात शेतीचे घराचे नुकसान झाले व त्यात जीवित हणी नाही जरी म्हणता आलीतरी पशु हाणी   मोठ्या प्रमाणात झाली आहे. म्हणून या पार्श्वभूमीवर मागच्या तीन चार दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्यात आम्ही सगळ्या ठिकाणी आम्ही पाहणी केली आणि आज पालक मंत्री जिल्ह्यात येत असताना त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नेते मंडळीच्या उपस्थित त्यांना निवेदन दिले आणि या निवेदनामध्ये आम्ही मागणी केलीय जिल्ह्यामध्ये तातडीने अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करावा. आणि त्या दुष्काळामुळे जी मदत शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना दिली जातेय ती तातडीने देण्यात यावी. अशी मागणी करते वेळी त्यांनी जिरायत जमिनीला सरसकट २५ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बागायत जमिनीसाठी ५० हजार रुपये प्रति हेक्‍टर मदत देण्यात यावी. व खवाटीच जे अनुदान असत जे त्या अतिवृष्टी मध्ये किंवा एखाद्या संकटामध्ये ज्या लोकांना कुटुंबाला जगण्यासाठी साथ द्यावी सहकार्य करावे व ती खवाटीच च अनुदान 10 हजार तातडीने देण्यात यावा. व ज्याचं पशुधन नष्ट झालय ज्यांची हाणी झालीय त्यांच्यासाठी मोठ्या जनावरांसाठी ५० हजार रुपये आणि जर शेळी-मेंढी छोटे जनावर असेल तर १० हजार रुपये त्या शेतकऱ्याला अनुदान दिल पाहिजे. त्यातच ते पुढे बोलत असताना म्हणाले की खूप मोठ्या प्रमाणात झोपड्या असतील गोटे असतील यांचेही नुकसान झाले आहे. त्यातच घरांचे देखील नुकसान झाले आहे.अशा विविध मागण्या च्या अनुषंगाने आज आम्ही निवेदन पालकमंत्र्यांना दिलं .व सोबत जिल्हाधिकाऱ्यांना देेखील दिल त्यावेळी त्यांच्या सोबत युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह निंबाळकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नेताजी पाटील, ज्येष्ठ नेते रामहरी शिंदेे, माजी पंचायत समिती सभापती दत्ता साळुंके इतर बाकीची टीम होती ते पुढे बोलत असताना म्हणाले की पालकमंत्र्यांनी भारतीय जनता पार्टी ला आश्वस्त केलं की येणाऱ्या काळात तातडीने आम्ही चांगल्या अर्थाने जिल्ह्यात मदत करू असे पालकमंत्री म्हणाले आहे. व काळे पुढे बोलत असताना म्हणाले की जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी आहे. या आपल्या माध्यमातून शेतकर्‍यांना आणि नागरिकांना अश्वस्थ  करतो की तुमच्यावर असलेल्या प्रत्येक संकटाला भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत राहील आणि प्रसंगी पिक  विमा च नाही तर हेसुद्धा अनुदान घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे हे सौंदाना येथे माध्यमांशी बोलत असताना म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"लागिर झालं जी" मालिकेतील कलाकारांच्या जीवाला धोका; खळबळजनक पोस्ट करत दिली माहिती

बहुला येथे बायप संस्थेच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण व वंधत्व शिबीर संपन्न

Indurikar Maharaj On Nilesh Lanke : इंदुरिकर महाराजांचा निलेश लंकेना हत्तीचा उल्लेख करून सल्ला...