लोकप्रतिनिधींना शिवराळ भाषा शोभते का ? शिवसेना आमदार संतोष बांगर यांची पोलिसाला शिवीगाळ केलेली ऑडियो क्लिप व्हायरल
लोकप्रतिनिधींना शिवराळ भाषा शोभते का ? शिवसेना आमदार संतोष बांगर यांची पोलिसाला शिवीगाळ केलेली ऑडियो क्लिप व्हायरल
शिवसेना आमदार संतोष बांगर यांची वाहतूक पोलिसाला शिवीगाळ केलेली ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिप मध्ये शिवसेना आमदार संतोष बांगर एका वाहतूक पोलिसाला थेट खालच्या भाषेत शिवीगाळ करताना स्पष्ट दिसत आहेत. कळमनुरी विधानसभेचे आमदार असलेले शिवसेनेचे संतोष बांगर शासकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची ही ऑडिओ क्लिप आहे. राजकीय नेत्यांना लोकांचे प्रतिनिधी म्हणून समाजात असणारा त्यांचा रुबाब, दबाव, असला तरी नेहमीच होत असलेली अरेरावीची भाषा लोकप्रतिनिधींना शोभते का ?
लोकप्रतिनिधींनी समाजामध्ये कसं वागावं ? लोकप्रतिनिधींची भाषा कशी असावी ? याचे प्रशिक्षण देण्याची आता गरज आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांची व्हायरल झालेली ही ऑडिओ क्लिप चार महिन्यांपूर्वीची असल्याचे बोलले जात आहे.
ज्यावेळी पोलिस अपघात झालेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत होते, त्यावेळी आमदार संतोष बांगर यांनी पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची ही ऑडिओ क्लिप प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे.
संपूर्ण प्रकरणावर बांगार यांची प्रतिक्रिया
व्हायरल झालेले ऑडिओ क्लिप वर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आपलं मत मांडलय. आपण बोलले शब्द हे अपघातातल्या मुजोर ट्रक चालकासाठी होते. पोलिसांसाठी नव्हते. असे स्पष्टीकरण बांगर यांनी दिले.
जरी ही भाषा आमदार साहेब ट्रक चालकासाठी वापरत होते, असे ते म्हणताय पण लोकप्रतिनिधीनी सामान्य नागरिकांशी अशा भाषेत भाष्य कराव का ? असा सवाल या निमित्ताने आता उपस्थित होतोय ? हि ऑडिओ क्लिप ऐकल्यावर त्या मध्ये कुठेही असं वाटत नाही की आमदार बांगर यांची भाषा पोलिसांसाठी नसून ट्रक चालकांसाठी होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा