केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीत ‘राष्ट्रीय सहकार परिषद’ संपन्न देशभरातील सहकार क्षेत्रातल्या 2,100 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन; देशविदेशातील सहा कोटी लोक आभासी माध्यमातून परिषदेत सहभागी
सहकार क्षेत्राचे देशाच्या विकासात महत्वाचे योगदान, सहकाराचे तत्व आत्मसात करूनच देशातील सहकारी चळवळीची वाटचाल होणे आवश्यक
सहकार चळवळीमुळे ग्रामीण भारताची प्रगती सुनिश्चित होईल तसेच नव्या सामाजिक भांडवलाचे संकल्पनाही निर्माण होईल
सहकार चळवळ ग्रामीण समाजाचाही विकास करेल आणि एका नव्या सामाजिक भांडवलाची संकल्पना त्यातून विकसित करता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.भारताचे सहकार क्षेत्र, भारतातील सहकारी चळवळ देशभरातील उत्तमोत्तम पद्धती एकमेकांना सांगण्यासाठीचे प्रभावी व्यासपीठ होऊ शकेल, असे आश्वासन, शाह यांनी आंतरराष्ट्रीय सहकार सहकार्याचे अध्यक्ष डॉ एरियल ग्वार्को यांना यावेळी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेनुसार, सहकाराच्या बळावर देशात विकासाचा एक नवा अध्याय लिहिला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आम्ही सहकार ही संस्कृती बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सहकार क्षेत्रात, देशातल्या सर्व राज्यांसोबत मिळून केंद्र सरकार काम करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. देशात सहकारविषयक सामाजिक सेवा केंद्र स्थापन करण्यासह आवश्यक ती आकडेवारी गोळा करण्याच्या दिशेने, सहकार मंत्रालय काम करत आहे , असे शाह यांनी सांगितले. त्याशिवाय, देशात एक राष्ट्रीय सहकार उपक्रम निर्माण करण्याची गरज आहे असे सांगत कोणत्याही सहकारी संस्थेने या उपक्रमासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यां नी केले
आज देशात राष्ट्रीय सहकार विद्यापीठ स्थापन करण्याची गरज आहे, असेही ते पुढे म्हणाले.
भारताचे सहकार क्षेत्र, भारतातील सहकारी चळवळ देशभरातील उत्तमोत्तम पद्धती एकमेकांना सांगण्यासाठीचे प्रभावी व्यासपीठ होऊ शकेल, असे आश्वासन, शाह यांनी आंतरराष्ट्रीय सहकार सहकार्याचे अध्यक्ष डॉ एरियल ग्वार्को यांना यावेळी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेनुसार, सहकाराच्या बळावर देशात विकासाचा एक नवा अध्याय लिहिला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आम्ही सहकार ही संस्कृती बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा