आरोग्य विभागाची परीक्षा लांबणीवर, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा माफीनामा
दिनांक 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबरला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि गट ड या प्रवर्गातील परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्यात येणार आहे.
6002 जागांसाठी घेण्यात येणारी आरोग्य विभागाची परीक्षा काल रद्द करण्यात आली असून पुढची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्याकरिता सर्वस्वी न्यासा संस्था जबाबदार असल्याचं राजेश टोपे म्हणाले. ही संस्था असमर्थ ठरली, अकार्यक्षम ठरली म्हणूनच आपल्याला आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून पुढे ढकलावी लागत आहे.
राजेश टोपे यांची माफी
आरोग्य विभागाचा प्रमुख म्हणून मी निश्चित प्रकारे माझ्या सर्व परीक्षार्थ्यांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, त्यांची माफी देखील मागतो असं आपल्या माफीनाम्याचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली.
पुढची तारीख कधी होणार जाहीर
आरोग्य विभागाची क आणि ड या प्रवर्गासाठी आज होणारी परीक्षा रद्द झालीय. परीक्षा रद्द झाल्याने उमेदवारांमध्ये संताप होतोय यामुळेच आता येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये नवीन तारीख जाहीर करणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अशा या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप झाल्याचं सोबतच परीक्षा रात्री उशिरा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या सुद्धा नुकसान झालंय.
एसटीतून विद्यार्थ्यांची घोषणाबाजी
आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झाल्याने औरंगाबाद मध्ये विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय. विद्यार्थ्यांनी एसटी तूनच थेट सरकारविरोधात घोषणाबाजी केलीय. परीक्षेसाठी आणि प्रवासासाठी झालेला खर्च कोण देणार ? असा सवाल यावेळी विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जातोय. रात्री उशिरा परीक्षा रद्द झाल्याने याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला यामुळेच विद्यार्थी संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा