करुणा शर्मा या प्रकरणावर दिली पंकजा मुंडे यांनी आपली सावध प्रतिक्रिया


काय म्हणाल्या पंकजा मुंडे आपली प्रतिक्रिया देताना?

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र राज्यात बलात्काराच्या घटना वारंवार वाढलेल्या पहायला मिळत आहेत. साकीनाका सारख्या धक्कादायक घटना घडल्यानंतर गुन्हेगारी ला आवरण्यास यश मिळू शकले नाही. याच मुद्यावर आज माजी ग्रामविकास मंत्री व भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया आज व्यक्त केली आहे . राज्यातील घटना मन सुन्न करणारी असल्याचे मत पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे . तसेच करूणा शर्मा या प्रकरणावर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

करुणा शर्मा या प्रकरणावर काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

पंकजा मुंडे यांनी बोलताना सांगितले की गेल्या काही दिवसापासून राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत अशा घटनांमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी प्रशासनाने त्याच्यावर कडक कारवाई करावी अशा संतप्त भावना पंकजा मुंडे यांनी बोलताना व्यक्त केल्या आहेत. करुणा शर्मा या प्रकरणाबद्दल विचारले असता त्याच्यावर त्यांनी बोलणे टाळले असले तरी त्यांनी कुणावरही अशी वेळ येऊ नये अशी सावध प्रतिक्रिया दिली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की राज्यात काही दिवसापासून राजकारणात चुकीचे वातावरण सुरू झाले आहेत या चुकीच्या वातावरणामुळे सामान्य लोकांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचे देखील त्यांनी आपल्या बोलण्यात सांगितले. व पुढे बोलत असताना त्यांनी राज्यातल्या राजकारणावर भाष्य करत राजकारणावर अतिशय वाईट वेळ आली असून त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनच खराब झाला असल्याच त्यांनी सांगितले पंकजा मुंडे या प्रकरणात याच्या अगोदर देखील त्यांनी परळी घडलेला प्रकार मन सुन्न करणारा असल्याचे त्यांनी सांगितलं होतं. राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारणात चुकीचा प्रकार सुरू झाला आहे या मुळे सामान्य लोकांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचे देखील त्यांनी बोलताना सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'निलिट' मध्ये 25 नोव्हेंबर रोजी मोफत भव्य रोजगार मेळावा.

हेलिकॉप्टर अपघात बिपिन रावत यांच्यासह पत्नी मधुलिका रावत यांचे देखील अपघाती निधन

चारोळ्यातुन पंकजा मुंडेंचा भाजपाला घरचा आहेर