बहुला येथे बायप संस्थेच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण व वंधत्व शिबीर संपन्न

 शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचे लाळ्या खुरकूत या आजारापासून बचाव व्हावा यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने व एचडीएफसी बँक च्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर व लसीकरण राबविण्यात आले होते‌.


बहुला: शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचे लाळ्या खुरकूत या आजारापासून बचाव व्हावा यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने व एचडीएफसी बँक च्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर व लसीकरण राबविण्यात आले होते‌. त्यावेळी ४३ गाई , 27 म्हशी व १० शेळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. त्याच बरोबर 
 लाळ्या खुरकूत हा विषाणूजन्य असून एका जनावराकडून दुसऱ्या जनावरांना होतो. यामुळे जनावरांचे व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये व रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बहुला येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने एचडीएफसी बँकेच्या संयुक्त विद्यमाने गावातील पाळीव जनावरांचे मोफत लसीकरण व वंधत्व करण्यात आले. लाळ्या खुरकूत रोगाबद्दल घ्यावयाच्या खबरदारीबाबत पशुपालकांना पशुधन पर्यवेक्षक डॉ विलास सोनटक्के यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. व तसेच बायफ संस्थेचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी डॉ कृष्णा जाधव दूध व्यवस्थापन मार्फत स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना प्रकल्प अंतर्गत पशुपालकांना कोणते लाभ मिळणार? याबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री सुधाकर बागल यांनी देखील वीर्य सॉर्टेड सिमेंन या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. लसीकरणासाठी श्री अतुल ढोकळ, श्री विजय फडके,( क्षेत्रिय प्रकल्प अधिकारी)
 श्रीविकास आरकडे( बायफ केंद्रप्रमुख) श्री बिक्कड ए आर( सरपंच) यांचे सहकार्य लाभले.

लसीकरण हाच उपाय

साधारणपणे डिसेंबर ते जून महिन्यापर्यंत लाळ खुरकूत या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. लाळ खुरकूत हा विषाणूजन्य रोग आहे. जनावरांच्या तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळते. जनावरांचे तोंड आणि पायांच्या खुरात जखमा होतात. त्यामुळे जनावरे चारा खाणे बंद करतात. जनावरास ताप येतो. जनावरांच्या जीभ, टाळू तसेच तोंडात फोड येतात. जनावरांना मागील पायात फोड आल्यास अपंगत्व येण्याचा धोका असतो. त्यामुळे जनावरांचे लसीकरण करणे महत्वाचे आहे. या आजारावर लसीकरण हाच एक उपाय आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"लागिर झालं जी" मालिकेतील कलाकारांच्या जीवाला धोका; खळबळजनक पोस्ट करत दिली माहिती

Indurikar Maharaj On Nilesh Lanke : इंदुरिकर महाराजांचा निलेश लंकेना हत्तीचा उल्लेख करून सल्ला...