आमदार कैलास पाटील यांचा पुर पाहणी दौरा


 रात्री कळंब तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेकडो एकर शेती पाण्याखाली असुन नदीला मोठा पूर आला आहे व नदीकाठच्या शेतात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

म्हणून आमदार कैलास पाटील यांनी आज रविवार तातडीने आपल्या ताप्या समवेत सकाळपासूनच कळंब तालुक्यातील आढाळा ,बहुला ,सात्रा, खोंदला ,आथर्डी नुकसान ग्रस्त गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन सविस्तर पणे आढावा घेणे सुरू केले आहे. त्यांच्यासोबत प्रशासकीय अधिकारी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तहसीलदार सौ विद्या शिंदे तलाठी ममता काळे, मंडळाधिकारी आर एन भिसे, कृषी सहाय्यक आर .कोठावळे, शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसे, प्रदीप बप्पा मेटे, मंदार आबा मुळीक, लक्ष्मण तात्या थोरबोले

कळंब तालुक्यातील गावांची सध्याची भयंकर परिस्थिती पाहता प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार कैलास पाटील यांनी प्रशासनाला करून पिक विमा धारक शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सांगितले व नदीकाठच्या घरांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या व पुराचे पाणी वाढत असल्यास वारंवार प्रशासनाला कळवत चला असे आढाळा येथे गावकऱ्यांना बोलताना आमदार म्हणाले व पुढे आढाळा येथील गावकऱ्यांनी रस्त्यावरील पुलाचा प्रश्न उपस्थित केल्याने आडसुळवाडी कडे जाणारा पूल खराब झाला असल्याने त्याची देखील आमदार यांनी पाहणी केेली व पुलाची स्थिती पाहून ते पुढील पुरग्रस्त गावांना भेट देण्यास निघून गेले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"लागिर झालं जी" मालिकेतील कलाकारांच्या जीवाला धोका; खळबळजनक पोस्ट करत दिली माहिती

बहुला येथे बायप संस्थेच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण व वंधत्व शिबीर संपन्न

Indurikar Maharaj On Nilesh Lanke : इंदुरिकर महाराजांचा निलेश लंकेना हत्तीचा उल्लेख करून सल्ला...