धक्कादायक ! अल्पवयीन बलात्कार पीडितेने बाळाला जन्म दिल्यानंतर शौचालयातच केले फ्लॅश ; अन् पुढे जे घडले ते...

केरळच्या कोची जिल्ह्यातील अत्यंत धक्कादायक घटना समोर आली...

एका अल्पवयीन मुलीवर एका वीस वर्षाच्या तरुणानं कथितरित्या बलात्कार केला. आणि या बलात्कारातूनच अल्पवयीन पीडित मुलगी गर्भवती राहिली. परंतु पुढे आश्चर्यचकित करणारे घडलं. बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीने वेळेआधीच नवजात बाळाला जन्म दिला आणि त्या अल्पवयीन मुलीने त्या बाळाला हॉस्पिटलच्या शौचालयातच फ्लॅश केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

मुलीने या बाळाला शौचालयातच जन्म दिला आणि तिथेच फ्लॅश करून ती मुलगी शौचालयातून बाहेर आली. पुढे तिने कुणालाही या बाबतीत सांगितले नाही. परंतु त्या मुली नंतर शौचालयात गेलेल्या व्यक्तीला बाळाचे अवशेष आढळले आणि त्या व्यक्तीने याबाबत पोलिसांना कळविले. मग पोलीस तपासादरम्यान त्या बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीनेच त्या नवजात बाळाला जन्म देऊन त्याला शौचालयात फ्लश केल्याची माहिती उघड झाली.

नंतर पोलिस चौकशीत या अल्पवयीन मुलीने या प्रकरणाची कबुली देऊन माझ्यावर 20 वर्षीय तरुणाने बलात्कार करून गर्भवती केल्याचं त्या अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या मुलीवर बलात्कार झालाय आणि ती सहा महिन्याची गर्भवती आहे असं त्या मुलीने कोणालाच सांगितलं नव्हतं.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती अल्पवयीन मुलीच्या आईला मिळाल्यावर त्या मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. या संपूर्ण प्रकरणाच्या आधारे वायनाड मधील एका व्यक्ती विरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपीला गुरुवारी अटक करून कोची येथे आणण्यात आले. त्याला लवकरच कोर्टात हजर करण्यात येणार आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'निलिट' मध्ये 25 नोव्हेंबर रोजी मोफत भव्य रोजगार मेळावा.

जिल्ह्याचे नेते व आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कळंब तालुका महिला उपाध्यक्ष पदी सौ.कविता जगताप यांची नियुक्ती

बहुला येथे बायप संस्थेच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण व वंधत्व शिबीर संपन्न