Indurikar Maharaj On Nilesh Lanke : इंदुरिकर महाराजांचा निलेश लंकेना हत्तीचा उल्लेख करून सल्ला...

 


Indurikar Maharaj Deshmukh : आमदार निलेश लंके तहसीलदाराच्या कथित ऑडियो क्लिपमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने इंदुरीकर महाराजांनी एका कार्क्रमादरम्यान आज लंके यांच्या कामचं कौतुक करून सल्लाही दिला.

 


 नगर : पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांच्या कथित ऑडियो क्लीपमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके हे वादत सापडल्याने निवृत्ती महाराज इंदुरिकर यांनी आमदार निलेश लंके यांचं भरभरून कौतुक केलं. " रस्त्याने जाताना कितीही कुत्री भुंकली तरीही हत्ती त्याकडे दुर्लक्ष करून चालत राहतो, तसे लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून पुढे वाटचाल करीत रहा.येणारी 25 वर्ष तुम्हाला धोका नाही; असा सल्लाच निवृत्ती महाराजांनी निलेश लंकेंना दिला.

शरद पवारांच्या नावाने आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं. याप्रसंगी निवृत्ती महाराज देशमुख यांना कीर्तनासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. किर्तन सुरू असताना निवृत्ती महाराज समाज प्रबोधन करताना आमदार निलेश लंके यांचं तोंडभरून कौतुक केले. कोविड सेंटरच्या माध्यमातून सुरू असलेल्या रुग्ण सेवेच्या कार्याचही त्यांनी कौतुक केलं. इंदुरिकार म्हणाले, " राज्यातील बरेच आमदार-खासदार साखर सम्राट, शिक्षण सम्राट तर कोणी उद्योगपती आहेत. मात्र त्या कोणालाही असं सेवाभावी कार्य करणार कोविड सेंटर सुरू करावं असं सुचलं नाही. ते काम आमदार निलेश लंके यांनी करून दाखवलं. राज्यातच नाही तर देश-विदेशात लंकेच्या कामाची दखल घेण्यात आली. निलेश लंकेला कोविड सेंटरमधून बरा झालेला प्रत्येक रुग्ण लंकेना आशीर्वाद देत आहे, त्यांच्या तोंडून बाहेर पडणारे आशीर्वादाचे शब्द लंकेंसाठी अमृतासमान आहे. लंकेच्या भाळणी येथील कोविड सेंटरमधून 22 हजार रुग्ण बरे करणारे लंके देवदूत आहे. बऱ्या झालेल्या रुग्णाच्या आशीर्वादाने लंके पुढं 25 वर्ष राजकारणात सहज टिकून राहतील. लंकेंना एवढी लोकप्रियता मिळाली असूनही त्यांचे पाय जमिनीवर आहे.

लंके तालुक्यात साधारण कार्यकर्त्यांसारखे वावरत आहेत. कोविड सेंटरमधून रुग्णांची सेवा करीत आहे. याचे फळ लंकेंना नक्की मिळेल. असं निवृत्ती महाराज देशमुख हे आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून म्हणाले.

लंकेच्या विरोधकांचा इंदुरिकरांनी चांगलाच समाचार घेतला. आणि लंकेना सल्लाही दिला. ' हत्ती गावात आला की कुत्री भुंकतात, परंतु हत्ती आपली चाल बदलत नाही. आणि तो त्याच्या ध्येयाकडे चालत राहतो'. त्यामुळे लंके तुमच्यावर कितीही कुत्री भूंकली तर तुम्ही त्याकडे लक्ष न देता तुमची यशाच्या दिशेने चालू असलेली वाटचाल सोडू नका' असा सल्ला इंदुरिकर महाराजांनी निलेश लंके यांना दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"लागिर झालं जी" मालिकेतील कलाकारांच्या जीवाला धोका; खळबळजनक पोस्ट करत दिली माहिती

बहुला येथे बायप संस्थेच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण व वंधत्व शिबीर संपन्न