'कपडे काढ, नाक घास, झाडू मार...' विद्यार्थिनीचा छळ तर, प्राध्यापकासह तिघांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
हदगाव तालुक्यातील गोविंदराव पऊळ नर्सिंग कॉलेजमधील एका विद्यार्थीनीने हदगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून प्राध्यापकासह तीन मुलींनी विरुद्ध हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित मुलगी वस्तीगृहात नवीन रहायला आली असल्याने वसतीगृहातील काही सिनियर मुलींनी तिच्यावर दमदाटी करून छळ केला आहे. रविवारी (दिनांक 12) दुपारी हा संपूर्ण प्रकार घडला. सीनियर मुलींनी कपडे काढ, नाक घास, झाडू मार, अशा प्रकारची रॅगिंग केली आहे. पीडित मुलगी या संपूर्ण घटनेची तक्रार करायला भगीरथ शिंदे या शिक्षकांकडे असता, प्राध्यापक शिंदे सरांनी या संपूर्ण प्रकरणावर कारवाई केली नाही. याउलट शिंदे सरांनी पीडित मुलीला वाईट हेतूने स्पर्श करायला सुरुवात केली. शिक्षकांनीच उलट धमकावल्याचं पीडित मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
पीडित मुली सोबत घडलेली संपूर्ण घटना तिने आपल्या वडिलांना सांगितली. पीडित मुलगी व तिचे वडील मंगळवारी हदगाव पोलिस ठाण्यात दाखल झाले, आणि त्यांनी हदगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी तीन विद्यार्थिनी सह संबंधित शिक्षकांवर गुन्हा दाखल केला. आणि आरोपी शिक्षकाला अटक देखील केली.
मात्र शिक्षकाला अटक केली म्हणून महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींनी याला कडाडून विरोध केला, आणि यामुळेच हा विषय हदगाव परिसरात चर्चेचा विषय बनला. शिक्षकाला अटक झाल्यानंतर या प्रकरणी खोटा गुन्हा दाखल झाल्याचं सांगत महाविद्यालयातील काही विद्यार्थिनी पोलीस ठाण्यात बाहेर मंगळवारी (दिनांक 14) रात्री आंदोलना सह, शिक्षकाला जोपर्यंत पोलिस ठाण्यातून सोडत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नसल्याचा पवित्राच या विद्यार्थिनींनी घेतला.
गुन्हे नेमके कोणते दाखल झाले
हदगाव पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह महाराष्ट्राचा छळवणूक रॅगिंग प्रतिबंधक अधिनियम 199 कलम चार प्रकरणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाळ रांजणकर यांच्याकडे आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा