भाजपा च्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली दसरा मेळाव्याच्या जागेची पाहणी.
पंकजा मुंडे गेल्या काही वर्षापासून दसरा मेळाव्याची परंपरा कायम राखत आल्या आहेत. पण 2020 पासून कोरोना नावाची महामारी आली असल्याने गेल्या वर्षी देखील ऑनलाइन दसरा मेळावा घेतला पण यंदा कोरोना चे गेल्यावर्षी पेक्षा कोरोना चे प्रमाण कमी असल्याने यावर्षी दर वर्षा प्रमाणे दसरा मेळावा होणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता .मात्र भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मी येत आहे तुम्ही येणार ना अशी साद घातल्याने या प्रश्नावर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह चे वातावरण दिसत आहे. त्या काल सावरगाव येथे बोलत होते.
काल दुपारी संत भगवान बाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव घाट येथे आल्या होत्या गावात आल्या नंतर त्यांनी सर्वप्रथम संत भगवान बाबा चे दर्शन घेतले व त्या ठिकाणी उभारलेल्या सुंदर अशा स्मारकाला भेट देताना स्वतः पाण्यात उतरून मूर्ती स्थळाचे दर्शन घेतले तसेच मेळावा मैदानाची पाहणी केली. त्यावेळी ग्रामस्थांना संवाद साधताना त्या म्हणाल्या दसरा मेळावा हा आपल्यासाठी स्वाभिमानाचा दिवस आहे. भक्ती आणि शक्तीचा संगम दरवर्षी या दिवशी येथे होतो असतो. मुंडे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आपण सर्वांना जपायचे आहे. जो कधी झुकत नाही ,जो जो कधी थकत नाही , असा वारसा तुमच्या सगळ्या मुळे मला मिळाला आहे तुमच्या जिवावरच मी लढू शकते. दर वर्षी दसरा मेळाव्याला देशातून एका रात्रीत लाखो लोक जमा होतात, असतात मागील वर्षी कोणामुळे ऑनलाईन मेळावा घेतला ही परंपरा अखंड ठेवण्यासाठी यंदा मी नतमस्तक होण्यासाठी येणार आहे असे तेथील ग्रामस्थांना संबोधित करताना सौ पंकजा मुंडे म्हणाल्या त्यावेळी त्यांच्यासमवेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी आमदार भीमराव धोंडे, राजेभाऊ मुंडे, भगवान भक्ती गड ट्रस्ट चे अध्यक्ष संदेश सानप ,पाटोदा पं .स सभापती सुवर्णा लांबरुड ,सावरगाव चे सरपंच राम सानप, आदी मान्यवरांसह परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा