Nagpur Car Stunt : नागपुरात Followers वाढवण्यासाठी तरुणांची स्टंटबाजी, कारसह चौघही अटकेत, नागपूर पोलिसांचा कार स्टंटबाजांना दणका
तरुणांनी कारचा स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आणि तो महागात पडला. स्टंट करणारे एकूण चार जण होते त्यांची नावे मोहनिस अहमद, विक्की जागडे, मोहनिस खान व अहमद पिजारे अशी आहेत.
नागपूरच्या सिव्हील लाईन भागात या स्टंटबाजांनी सोशल मीडियावर आपले फॉलोवर्स वाढावे या हेतूने कारचे स्टंट करत भर रस्त्यावर हैदौस घातला. या प्रकरणाची नागपूर पोलिसांनी चांगलीच दखल घेतली आणि या चार उच्छाद घालणाऱ्या स्टंट बाजांना त्यांचे घरचे पत्ते शोधून अटक केली.
त्यांच्या स्टंट मुळे त्यांचा स्वतः चा पण आणि इतरांचा पण जीव धोक्यात येतो या स्टंट करताना वापरलेले वाहने ही पोलिसांनी ताब्यात घेतले. कारण त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या मोबाईल मध्ये या आधी केलेले स्टंट करतानाचे व्हिडिओ पोलिसांना मिळाले. त्यामुळे स्टंट करताना वापरलेले त्यांचे टू व्हीलर आणि फोर व्हिलर वाहने पोलिसांनी ताब्यात घेतले.
हे सर्व स्टंटबाज तरुण 25 वर्षापेक्षा लहान आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा