पोस्ट्स

भोगजी येथील महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

इमेज
 प्रतिनिधी कळंब तालुक्यातील आढाळा येथे अनेक दिवसापासून आढाळा गावाकडे जाणारे फिटर ला मंजुरी मिळून देखील फिटर वेगळे होत नसल्याने शेतकऱ्यांनी दि 30 आक्रमक पवित्रा घेत भोगजी येथील महावितरणच्या कार्यालयावर निवेदन देत आंदोलन केले. उस्मानाबाद: कळंब तालुक्यातील भोगजी येथुन आढाळा या गावाकडे जाणारे विजेचे फिटर वेगळे होण्याला मंजुरी मिळाली असून देखील प्रशासनाकडून त्यांचे काम होत नसल्याने. व पुर्वीच्या फिटर वर जास्त लोड होत असल्याने .त्या फिटर चा वारंवार बिघाड होत असल्याने. शेतीला पाणी देणे देखील अवघड झाले आहे .व त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवार दि ३० आक्रमक पवित्रा घेत भोगजी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. विजेचा वारंवार त्रास सहन करत होते मात्र बुधवारी शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा स्फोट झाला. आणि त्यांनी महावितरणच्या भोगजी येथील विद्युत केंद्रावर जाऊन आक्रमक होत आंदोलन केले सदर आंदोलनात फिटर वेगळे करून बाकीच्या गावा प्रमाणे वीजपुरवठा मिळावा अशी मागणी देखील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. वेळेवर मोटारीचे बिल नाही भरले तर कनेक्शन काढतात, मग विज बिल भरून देखील वीज का पुरती म...

"लागिर झालं जी" मालिकेतील कलाकारांच्या जीवाला धोका; खळबळजनक पोस्ट करत दिली माहिती

इमेज
छोट्या पडद्यावरील 'लागिर झालं जी' ही सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील गेल्या दोन दिवसापूर्वी चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे नीतीश चव्हाण. या मालिकेतील अभिनेता डॉ. ज्ञानेश माने यांचे अपघाती निधन झालं. मात्र सोशल मीडियावर या कलाकार ऐवजी नीतीश चव्हाण (अज्या) चा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊन नितीशचाच अपघाती मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे नितीश चव्हाण (अज्या) च्या चाहत्या वर्गाकडून दुःख व्यक्त केलं जात होते. मात्र याबाबत काही वेळातच खुलासा होऊन सत्य समोर आलं आणि नेमकं कोणाचा अपघाती मृत्यू झाला हे स्पष्ट झालं. आणि नीतीच्या चाहत्यानी दिलासा व्यक्त केला. नीतीश चव्हाण 'लागिर झालं जी' या मालिकेतील अज्याच्या भूमिकेने लाखो लोकांची मनोज जिंकली आणि त्यांच्या मनात जागा निर्माण केली. आणि अज्याच्या भूमिकेमुळे त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. आता अशातच नितीश चव्हाणने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक पोस्ट शेअर केली आहे. आणि हिच पोस्ट बघून त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. या पोस्टमध्ये नितीश चव्हाणने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये नीतीश एक फलक घेऊन...

वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला पूर्ण अधिकार सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय | The Lokhit News

इमेज
  वडीलांच्या मृत्यूनंतर वडिलांच्या संपत्तीवरून भाऊ-बहिणींमध्ये अनेकदा वाद बघायला मिळतो. वडिलांची मालमत्ता वाटपावरून अनेकदा हा वाद कोर्टापर्यंत देखील जाताना आपण अनेकदा पाहतो. आणि अनेक वेळा भावा-बहिणींमध्ये वैर निर्माण होत ते ह्याचं संपत्तीच्या वादातून तर कधी भांडणे ही होताना आपण अनेकदा बघितलंय. मात्र हाच वाद आता कमी होताना दिसणार आहे. कारण तसा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. वडीलांच्या संपत्तीमध्ये मुलीला पहिला हक्क असेल असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय ? "एकत्रित कुटुंबात राहत असणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू हा मृत्यूपत्र तयार न करता झाला असल्यास त्याच्या संपूर्ण मालमत्तेवर त्याची मुलगी उत्तराधिकारी असेल", "तसेच मुलींच्या चुलत भावांपेक्षा संपत्तीचा वाटा मुलीला देण्यास प्राधान्य दिलं जाईल. हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 लागू होण्यापूर्वीच्या संपत्ती वाटपाला ही अशीच व्यवस्था लागू होईल" असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल आहे. तमिळनाडू मधील एका खटल्याचा निकाल देताना न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आणि कृष्ण मुरारी यांच्या ...

डेट वर जाण्याआधी नाव केले गुगल उत्तर बघून महिला हैराण

इमेज
अनोळखी व्यक्तीसोबत डेटवर जाण्यापूर्वी महिलेने गुगलवर नाव सर्च केले, निकाल बघून पायाखालची जमीन सरकली! अनोळखी व्यक्तीसोबत डेटवर जाण्यापूर्वी महिलेने गुगलवर नाव सर्च केले, निकाल बघून पायाखालची जमीन सरकली! महिलेने गुगलवर तारखेचे नाव शोधले तेव्हा ती थक्क झाली.     महिलेने गुगलवर तारखेचे नाव शोधले तेव्हा ती थक्क झाली. अमेरिकेतील नॅशविल येथे राहणारी शायना के कार्डवेल एका कंपनीत रिक्रूटमेंट मॅनेजर म्हणून काम करते. अलीकडेच, त्याने आपल्या विचित्र डेटिंग अनुभवाबद्दल सांगितले. आजकाल डेटिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. लोक ऑनलाइन डेटिंग साइट्सवर लोकांना भेटतात आणि त्यांच्याबद्दल नकळत त्यांना भेटण्यास सहमती देतात. अशा वेळी अनेकवेळा त्यांची फसवणूकही होते.  नुकतेच अमेरिकेतील एका महिलेसोबतही असेच घडले, जी एका अज्ञात पुरुषासोबत डेटिंग करत होती. पण जाण्यापूर्वी त्याने गुगलवर त्याचे नाव तपासले. अमेरिकेतील नॅशविल येथे राहणारी शायना के कार्डवेल एका कंपनीत रिक्रूटमेंट मॅनेजर म्हणून काम करते. अलीकडेच, त्याने आपल्या विचित्र डेटिंग अनुभवाबद्दल सांगितले. शायनाने सांगितले की, तिला हिंज नावाच्या...

Salman Khan Snake Bite | सलमान खानला चावला साप | साप चावल्यावर काय करावेत जाणून घ्या

इमेज
 अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) उद्या वाढदिवस (Birthday) आहे आणि आज तो एका मोठ्या संकटातून वाचला. होय तुम्ही बरोबर वाचत आहे. सलमान खान खूप मोठ्या संकटातून वाचलाय. सलमान खानला त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊस येथे साप चावला (Snak). साप हा बिनविषारी असल्याने मोठा अनर्थ टळला. साप चावल्यानंतर सलमान खानला पहाटे नवी मुंबई मधल्या कामोठे परिसरातील एमजीएम (महात्मा गांधी मिशन) या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर सलमान खान ला सकाळी नऊ वाजता घरी सोडण्यात आले. सध्या सलमान खानची प्रकृती ठिक असल्याचे कळते. (Salman Khan Snake Bite) साप चावल्यावर लगेच कोणते उपचार करावेत आणि साप विषारी आहे की बिनविषारी हे कसं ओळखायचं हे आपण जाणून घेऊया :  1) साप चावल्यावर लगेच खचून न जाता संयम व धीर धरावा. 2) साप चावलेली जागा (जखम) स्वच्छ धुऊन घेतली पाहिजे. 3) जखम ज्या ठिकाणी झालीय, म्हणजे सापाने जिथे दंश केलाय त्या ठिकाणाहून शरीराकडे जाणाऱ्या धमन्या घट्ट बांधून घ्यावी. जेणेकरून शरीरात विष जास्त प्रमाणावर भिनणार नाही. उदा. साप जर पायाच्या अंगठ्याला चावला असेल, तर गुडघ्याच्या खालचा भाग म...

हेलिकॉप्टर अपघात बिपिन रावत यांच्यासह पत्नी मधुलिका रावत यांचे देखील अपघाती निधन

इमेज
  भारतीय लष्कराचे सी डी एस जनरल बिपिन रावत सोबत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे देखील अपघाती निधन झाले आहे. भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत त्यांच्यासह 14 जणांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर आज दुपारी १२ च्या सुमारास तमिळनाडूच्या उटी कुन्नूर डोंगराळ भागांमध्ये कोसळल्या नंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले . होते मात्र या अपघातात सी डी एस जनरल बिपिन रावत हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .मात्र त्यांचा उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.व त्यात यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे देखील निधन झाले आहे.  रावत यांनी आपल्या आयुष्यातील 37 वर्ष लष्करासाठी समर्पित केले होते .  दलबीर सिंह सुहाग हे 31 डिसेंबर 2016 लष्कर प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी बिपिन रावत यांची नियुक्ती करण्यात आली होती.  बिपिन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत त्यांची एक सप्टेंबर 2016साली भारतीय सेनेच्या उपप्रमुख पदी नियुक्ती झाली होती.  रावत यांच...

OBC आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावे लागले तरी घ्यावे: पंकजाताई मुंडे

इमेज
   ओबीसी ची झालेली हानी भयंकर आहे. यात मार्ग निघालाच पाहीजे.  OBC ची झालेली हानी भयंकर आहे.यात मार्ग निघालाच पाहिजे. विषय राजकारणाचा नाही. विषय अस्तित्त्वाचा आहे.दोषा रोप नको मार्ग काढावा.त्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावे लागले तरी घ्या अशी मागणी करणारी ट्विट पोस्ट भाजपा च्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी केल आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देता येणार नाही असा स्पष्ट आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. तसेच राज्य सरकारच्या आदेशाला न्यायालयाने पुढील सुनावणी पर्यंत स्थगिती दिली आहे. राज्य सरकारच्या ओबीसी च्या राजकीय आरक्षणाला न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश सम्मानीय सुप्रीम कोर्टाकडून स्थगित झाला आहे, ऑर्डर अजून प्राप्त नाही पण ट्रिपल टेस्ट नाही झाली हा उल्लेख आहे. या संदर्भात सर्व अभ्यासकांनी एकत्र येऊन मार्ग काढणे आवश्यक आहे. विशेष अधिवेशन घ्य...

प्रसून जोशी यांना 2021चा भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व पुरस्कार प्रदान

इमेज
 “एक आसमान कम पड़ता है, और आसमान मंगवा दो, है बेसब्रा उड़ने में , मेरे पंख नीले रंगवा दो, स्वप्न करोड़ों सत्य हो रहे है , अब उन का सत्कार करो, निकल पड़ा है भारत मेरा , अब तुम जयजयकार करो.  प्रसून जोशी   काल गोवा येथे झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात सुप्रसिध्द गीतकार प्रसून जोशी यांना यंदाचे “भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व- 2021’’ हा पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यानंतर जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले . चित्रपट क्षेत्राबरोबरच संस्कृती आणि सामाजिकदृष्टीने महत्वपूर्ण कलात्मक कार्यामध्ये प्रसून जोशी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा प्रतिष्ठित सन्मान देऊन गौरव करण्यात आला. प्रसून जोशी यांनी विविध चित्रपटांसाठी गीतलेखन केले असून त्यांची काही गीत खूप गाजली. यामध्ये तारे जमीं पर, रंग दे बसंती, हम तुम, फना, आकर्षण, दिल्ली 6, गजनी, नीरजा, मनकर्णिका या चित्रपटांचा समावेश आहे. अनेक चित्रपटांमधली जोशी यांची गाणी लोकप्रिय ठरली आहेत.यावेळी त्यांनी युवा कलाकारांना मनातील गोंधळालाही जपले जपण्याच...

बहुला येथे बायप संस्थेच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण व वंधत्व शिबीर संपन्न

इमेज
  शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचे लाळ्या खुरकूत या आजारापासून बचाव व्हावा यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने व एचडीएफसी बँक च्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर व लसीकरण राबविण्यात आले होते‌. बहुला : शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचे लाळ्या खुरकूत या आजारापासून बचाव व्हावा यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने व एचडीएफसी बँक च्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर व लसीकरण राबविण्यात आले होते‌. त्यावेळी ४३ गाई , 27 म्हशी व १० शेळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. त्याच बरोबर   लाळ्या खुरकूत हा विषाणूजन्य असून एका जनावराकडून दुसऱ्या जनावरांना होतो. यामुळे जनावरांचे व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये व रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बहुला येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने एचडीएफसी बँकेच्या संयुक्त विद्यमाने गावातील पाळीव जनावरांचे मोफत लसीकरण व वंधत्व करण्यात आले. लाळ्या खुरकूत रोगाबद्दल घ्यावयाच्या खबरदारीबाबत पशुपालकांना पशुधन पर्यवेक्षक डॉ विलास सोनटक्के यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. व तसेच बायफ संस्थेचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी डॉ कृष्णा जाधव दूध व्यवस्थापन मार्फत स्थान...

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी 12 व्या भारतीय अवयवदान दिनाच्या सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविले त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार उपस्थित होत्या

इमेज
 जिवंतपणी रक्तदान आणि मरण पावल्यावर अवयवदान : हे आपल्या जीवनाचे बोधवाक्य असले पाहिजे”: डॉ. मांडवीय अवयवदान म्हणजे समाजाचे ऋण फेडण्यासाठी निसर्गाने दिलेली आणखी एक संधी आहे”: डॉ. भारती पवार काल झालेल्या १२ भारतीय अवयवदान या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ मनसुख मांडवीया बोलत होते त्यावेळी बोलत असताना म्हणाले की रक्तदान आणि मरण पावल्यावर अवयवदान : हे आपल्या जीवनाचे बोधवाक्य असले पाहिजे”: असे उद्गार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब विकास मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल 12 व्या भारतीय अवयवदान दिनाच्या सोहळ्यात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत काढले. मृत दात्याकडून मिळालेल्या अवयवाच्या रोपणानंतर एका रुग्णाला मिळालेली नव्या जीवनाची भेट साजरी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन करून केंद्रीय मंत्र्यांनी देशातील अवयव दात्यांपेक्षा अवयव रोपणासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढलेली असताना, अवयव दानाला प्रोत्साहन दिले. जवळच्या व्यक्तीच्या मृत्युनंतर अत्यंत दुःखद प्रसंगी मृत व्यक्तीच्या अवयव दानासाठी परवानगी देणाऱ्या कुटुंबियां...

'निलिट' मध्ये 25 नोव्हेंबर रोजी मोफत भव्य रोजगार मेळावा.

इमेज
औरंगाबाद:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रौद्योगिकी संस्थान (निलिट) व मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने   25 नोव्हेंबर २०२१ रोजी , १८ ते ३५ वयोगटातील बेरोजगार युवक व युवतींसाठी   भव्य रोजगार मेळाव्याचे चे आयोजन करण्यात आले आहे.    शुक्रवारी 19 नोव्हेंबर पासून या रोजगार मेळाव्याचे मोफत नोंदणी सुरू करण्यात आली आहे.   रोजगार मेळाव्यामध्ये आपले आधार कार्ड, बायोडेटा आणि गुणपत्रक घेऊन येणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यातून मिळणाऱ्या नोकरीसाठी कुठल्याही प्रकारची फि घेतली जाणार नाही. या रोजगार मेळाव्यामध्ये औरंगाबाद पुणे मुंबई येथील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून कला वाणिज्य विज्ञान आयटीआय डिप्लोमा डिग्री इंजिनिअरिंग या सर्व बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. या रोजगार मेळाव्यामध्ये एक हजार अधिक जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार केली जाणार आहे. जास्तीत जास्त गरजू व बेरोजगार विद्यार...

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या नवभारत गव्हर्नरन्स पुरस्काराने सन्मानित.

इमेज
  सोलापूर : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना 'नवभारत गव्हर्नन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शनिवार दि. 20 नोव्हेंबर रोजी मुंबईत राज्यात भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थित पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना सन्मानित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते त्यांच्यासोबतच  जिल्हा अधिकारी मिलिंद  शंभरकर यांनाही नवभारत गव्हर्नन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये  जिल्ह्यात पोलीसांनी अति उत्तम काम केल्यामुळे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या कोरोणा पॉझिटिव्ह आल्या .मात्र त्यांनी वर्क फ्रॉम होम द्वारे आपले कर्तव्य पार पाडत राहिल्या. व सोलापूर जिल्ह्यात काम करताना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या माध्यमातून ऑपरेशन  परिवर्तन या उपक्रमामुळे अनेकांना अवैध धंद्या यापासून दूर करून चांगल्या व्यवसायाकडे  वळवल्याने, त्यामुळे त्यांची राज्यभरात चर्चा सुरू आहे.  ग्रामीण भागातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न  ...

लग्न लावून देत नसल्याने पित्यावर कुऱ्हाडीने घाव ; रागाच्या भरात तरुणाने केलं गे कृत्य!

इमेज
वाशिम, 06 नोव्हेंबर: वाशिम जिल्ह्यातील जऊळका याठिकाणी एका तरुणाने आपल्या वडिलांची निर्घृणपणे हत्या केली आहे. शुक्रवारी रात्री आरोपी मुलाने कुऱ्हाडीने वार करत आपल्या जन्मदात्या पित्याला संपवलं. याप्रकरणी जऊळका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाची चौकशी केली असता, हत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. धर्मा भारती असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव असून ते वाशिम जिल्ह्याच्या जऊळका येथील रहिवासी आहेत. तर प्रमोद भारती असं अटक केलेल्या मुलाचं नाव आहे. आरोपी मुलगा प्रमोद हा 27 वर्षांचा असून त्याला विविध प्रकारचे व्यसनं आहेत. आपला मुलगा काहीच काम करत नाही, तसेच त्याला विविध प्रकारची व्यसनं आहेत, त्यामुळे मृत वडील धर्मा हे मुलाचं लग्न लावून देत नव्हते. त्यामुळे प्रमोद याचा आपल्या वडिलांवर राग होता. याच रागातून प्रमोद याने आपल्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली आहे. शुक्रवारी रात्री हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोप...

शेतकऱ्यांनाही आता CNG पंपासाठी डीलरशिप

इमेज
नवीन व्यवसायासाठी सीएनजी पंप उभारणे हा सर्वोत्तम उपाय आहे. केंद्र सरकारने सीएनजी गॅस स्टेशन उभारण्यासाठी प्रोत्साहन योजना हाती घेतली आहे. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून सीएनजी पंप उभारून आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध करून दिला जात आहे. राजधानी दिल्लीसह प्रमुख राज्यांमध्ये सीएनजी पंप एजन्सी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राजधानी दिल्लीत सर्वाधिक सीएनजी पंप आहेत. इतर राज्यांमध्ये, सीएनजीच्या ऑनलाइन डीलरशिप प्रक्रियेला वेग आला आहे. सीएनजी पंप उभारण्यासाठी आवश्यक पात्रता आणि अटी खालीलप्रमाणे आहेत- अर्जदार हा भारताचा नागरिक असावा. अर्जदाराचे शिक्षण किमान दहावी पूर्ण झालेले असावे. अर्जदाराचे वय 21ते 55 दरम्यान असावे. या सर्व अटींसह सीएनजी पंप उघडण्यासाठी अर्जदाराकडे स्वताची जमीन असणे आवश्यक आहे. सीएनजी पंपासाठी किती जमीन उपलब्ध असावी? सीएनजी पंप सुरू करण्यासाठी अर्जदाराकडे जमीन असणे ही मूळ अट आहे. तुमच्या मालकीची जमीन नसेल तर दुसऱ्या जमीन मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या जमिनीसाठी सीएनजी पंपासाठीही अर्ज करू शकत...

देशभरात खाद्यतेलाच्या दरामध्ये घट

इमेज
 सरकारने कच्चे पामतेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील मूलभूत शुल्क २.५ टक्क्यांवरून शून्यावर आणले खाद्यतेलाचे दर नियंत्रित करण्यासाठी सरकार पामतेल, सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलावरील आयात शुल्क तर्कसंगत केले; प्रमुख खाद्यतेल कंपन्यांनी घाऊक दर ४ -७ रुपये प्रति लिटरने केले कमी केंद्र आणि राज्य सरकारांच्या सक्रिय सहभागामुळे खाद्यतेलाच्या दरांमध्ये घटगेल्या एक वर्षापासून खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असताना सरकारने कच्चे पामतेल, कच्चे सोयाबीनतेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील मूलभूत शुल्क २.५% वरून शून्य केले आहे. या तेलांवरील कृषी उपकर कच्च्या पाम तेलासाठी 20% वरून 7.5%, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलासाठी 5% वर आणले आहे. या कपातीमुळे, कच्च्या पाम तेलासाठी एकूण 7.5% आणि कच्च्या सोयाबीन तेल तसेच कच्च्या सूर्यफूल तेलासाठी 5% शुल्क झाले आहे. आरबीडी पामोलिन तेल, प्रक्रिया केलेले सोयाबीन आणि प्रक्रिया केलेल्या सूर्यफूल तेलावरील मुलभूत शुल्क सध्याच्या 32.5% वरून 17.5% पर्यंत कमी करण्यात आले आहे कपात करण्यापूर्वी, सर्व प्रकारच्या कच्च्या खाद्यतेलांवरील कृषी...

राष्ट्रीय एकता दिना निमित्त संबोधन

  नमस्कार ! राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सर्व देशवासियांना खूप-खूप शुभेच्छा ! 'एक भारत, श्रेष्ठ भारत' आमच्यासाठी प्रत्येक क्षण ज्याने विशिष्ट केला, त्या राष्ट्राचे सरदार वल्लभ भाई पटेल यांना आज देश श्रद्धांजली अर्पण करत आहे. सरदार पटेल जी इतिहासातच नाही तर आपल्या देशवासियांच्या हृदयात देखील आहेत . आजमितीला एकतेचा संदेश जोडण्यासाठी आपले ऊर्जावान सहकारी भारताचे अखंड भावनेचे प्रतीक आहेत. ही भावना आपण देशाच्या काकोपऱ्यात जात आहोत, राष्ट्रीय एकता संचलनात, स्टॅच्यू ऑफकी येथे अस्तित्वात आहोत. मित्रांनो , भारत एक भौगोलिक प्रदेश नाही तर आदर्श, संकल्पना, सभ्यता-संस्कृत उदार मानकर पूर्ण राष्ट्र आहे. धरतीच्या ज्या भूभागावर आपण 130 कोटींहून अधिक भारतीय राहतो तो आपला आत्मा, आपले स्वप्ने. आपल्या आकांक्षांचा अखंड भाग आहे. शेकडो एक मजबूत भारताची समाजात आहे , परंपरांमध्ये काँग्रेसचा जो पाया विकसित झाला आहे , त्याने 'ची भावना समृद्ध केली आहे. मात्र आपण हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे की प्रत्येक प्रवाशाला खात्रीची खात्रीशीर सल्लामसलत. आपण एकत्र आहोत, तेव्हाच देश उद्दिष्टे प्राप्त करू. मित्रा...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत किनारी सुरक्षेबाबत सल्लागार समितीची बैठक

इमेज
 केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली, आज नवी दिल्लीत किनारी सुरक्षा, मुख्य सल्लागार समिती बैठक. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि अजय मिश्रा, केंद्रीय गृह सचिव, मस्त्यपालन सचिव, भारतीय रक्षक दल आणि गृहमंत्रालयाच्या तटबंदी या बैठकीला उपस्थित होते. गृहमंत्रालय किनारी सुरक्षेच्या बाबतीत येणाऱ्या आव्हानांचे गांभीर्याने अध्ययन करत आहे, असे अमित शाह यावेळी म्हणाले. या बैठकीत दिलेल्या सूचनांचा विचार करुन, सर्व राज्यांच्या मदतीने, किनारी सुरक्षा अभेद्य बनवण्यासाठी योग्य आणि आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत. पहिल्यांदाच भारतातील सर्व बेटांचे सर्वेक्षण केले जात आहे आणि या सर्वेक्षणानंतर मिळालेल्या अहवालांच्या आधारे अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. किनारी सुरक्षेत अनेक मंत्रालये आणि यंत्रणांची भूमिका महत्वाची असते, असे सांगत, त्यांच्यात समन्वय निर्माण करून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सर्व हितसंबंधियांची बैठक घेऊन किनारी सुरक्षा अधिक मजबूत केली जाईल, असेही अमित शाह म्हणाले. बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली आणि किनारी ...

सासरी जाण्यास केला उशीर, पत्नीचा खून

इमेज
शिराढोण (जि. उस्मानाबाद): माहेरी आलेल्या विवाहितेने सासरी जाण्यास एक दिवस विलंबाची मागणी केली असता पतीने थेट विळ्याने वार करून पत्नीचा खून केला. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली याप्रकरणी शिरढोण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरढोण येथील मारुती माने यांनी जालना जिल्ह्यातील मांजरगाव येथील कृष्णा जाधव याच्याशी त्यांची मुलगी काजल हीचा विवाह करून दिला होता. संसार सुरळीत सूरू असताना मागील सप्टेंबर महिन्यात काजल ही आजारी पडली होती त्यामुळे तिच्या पतीने औषधोपचारासाठी तिला माहेरी सोडले तेव्हापासून ती शिराढोणमध्येच होती. यानंतर २० सप्टेंबर रोजी काजलचा पती कृष्ण हा तिला घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरी शिरढोण येथे आला होता त्यादिवशी मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कृष्णाने सकाळीच निघायचा आग्रह केला होता. तेव्हा काजल व तिची आई यांनी उद्याचा एक दिवस मुक्काम करूयात अशी चर्चा केली. यानंतर शुक्रवारी दुपारी सराफा दुकानातून काही दागिने खरेदी केल्या नंतर कृष्णा व काजल घराकडे परतले तेव्हा घरी कोणी नसल्याने आरोपी कृष्णाने संधी साधत आजच सासरी का नबी येत यावरुन वाद घातला आणि काजल ला स्टीलच्या...

तू सैतानाचा अवतार; तुझा बळी द्यावा लागेल, तीला नग्न करून केले अघोरी कृत्य

इमेज
बारामती: दोन दीर व सासूने एका ४० वर्षीय महिलेला ती सैतानाचा अवतार आहे असे सांगून अघोरी कृत्यासह नग्न करत तिचा गळा दाबून बळी देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार करंजे पूल (ता. बारामती) येथे घडला बारामती पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यासह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पीडित महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महेंद्र माणिकराव राजेंद्र माणिकराव गायकवाड, कौशल्या, ननंद नीता अनिल जाधव व तात्या नावाचा मांत्रिक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पीडित महिला पती दोन मुले दोन दीर सोबत एकत्रित राहते. महिलेचे पती नामवंत बँकेत उच्चपदस्य अधिकारी आहेत. महेंद्र व राजेंद्र हे महिलेचे दीर असून कौशल्या या सासु आहेत. विवाहात हुंडा जादा दिला नाही, या कारणावरून सासू व दिराकडून तिचा छळ केला जात होता. नणंद माहेरी आल्यानंतर तिनेही त्यांची साथ दिली तात्या नामक मांत्रिकाला घरी बोलावले त्याने या अघोरी कृत्य करणे उपाशी ठेवणे असे प्रकार केले ● तू पांढऱ्या पा...

उस्मानाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री शंकरराव गडाख यांच्या उस्मानाबाद दौऱ्यात गोंधळ

इमेज
  उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली आहे. उस्मानाबाद: पालकमंत्री शंकरराव गडाख हे उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान कळंब तालुक्यातील बहुला या गावात कोल्हापुरी बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री आले होते. त्याच वेळी उस्मानाबाद जिल्ह्यात  अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची देखील ते पाहणी करत होते. मात्र सरकारने जाहीर केलेली मदत हि तुटपुंजी आहे असे सांगण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आले होते .त्यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता सत्कार स्वीकारण्यात व्यस्त राहिल्याने. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना नुकसान झालेले सोयाबीन दाखवण्यास आणले होते. मात्र पालकमंत्र्यांनी ते सोयाबीन न पाहिल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. व त्यावेळी यांच्यासोबत उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ओमराजे निंबाळकर आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्...