भोगजी येथील महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

 प्रतिनिधी

कळंब तालुक्यातील आढाळा येथे अनेक दिवसापासून आढाळा गावाकडे जाणारे फिटर ला मंजुरी मिळून देखील फिटर वेगळे होत नसल्याने शेतकऱ्यांनी दि 30 आक्रमक पवित्रा घेत भोगजी येथील महावितरणच्या कार्यालयावर निवेदन देत आंदोलन केले.

उस्मानाबाद: कळंब तालुक्यातील भोगजी येथुन आढाळा या गावाकडे जाणारे विजेचे फिटर वेगळे होण्याला मंजुरी मिळाली असून देखील प्रशासनाकडून त्यांचे काम होत नसल्याने. व पुर्वीच्या फिटर वर जास्त लोड होत असल्याने .त्या फिटर चा वारंवार बिघाड होत असल्याने. शेतीला पाणी देणे देखील अवघड झाले आहे .व त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवार दि ३० आक्रमक पवित्रा घेत भोगजी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. विजेचा वारंवार त्रास सहन करत होते मात्र बुधवारी शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा स्फोट झाला. आणि त्यांनी महावितरणच्या भोगजी येथील विद्युत केंद्रावर जाऊन आक्रमक होत आंदोलन केले सदर आंदोलनात फिटर वेगळे करून बाकीच्या गावा प्रमाणे वीजपुरवठा मिळावा अशी मागणी देखील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. वेळेवर मोटारीचे बिल नाही भरले तर कनेक्शन काढतात, मग विज बिल भरून देखील वीज का पुरती मिळत नाही. असा सूर व्यक्त होत होता. अधिकार्‍यांच्या आश्‍वासनानंतर सदरील आंदोलन मागे घेण्यात आले. त्या आंदोलनात भाजप नेते अरुण काका चौधरी, जयचंद वायसे ,आण्णासाहेब शिंदे ,शिवाजी शिंदे, रामदास इंगळे ,अमोल वायसे, सुनील वायसे, वैभव हगारे, लहुदास हगारे,प्रकाश डोपरे , सोपान हगारे, रावण वायसे, रविंद्र वायसे, जयसिंग शिंदे, सज्जन शिंदे ,रहीम पठाण, बालाजी वायसे, प्रवीण पवार ,बळीराम शिंदे, आधी शेतकरी सहभागी झाली होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"लागिर झालं जी" मालिकेतील कलाकारांच्या जीवाला धोका; खळबळजनक पोस्ट करत दिली माहिती

बहुला येथे बायप संस्थेच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण व वंधत्व शिबीर संपन्न

Indurikar Maharaj On Nilesh Lanke : इंदुरिकर महाराजांचा निलेश लंकेना हत्तीचा उल्लेख करून सल्ला...