उस्मानाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री शंकरराव गडाख यांच्या उस्मानाबाद दौऱ्यात गोंधळ
उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली आहे.
उस्मानाबाद: पालकमंत्री शंकरराव गडाख हे उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान कळंब तालुक्यातील बहुला या गावात कोल्हापुरी बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री आले होते. त्याच वेळी उस्मानाबाद जिल्ह्यात
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची देखील ते पाहणी करत होते. मात्र सरकारने जाहीर केलेली मदत हि तुटपुंजी आहे असे सांगण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आले होते .त्यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता सत्कार स्वीकारण्यात व्यस्त राहिल्याने. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना नुकसान झालेले सोयाबीन दाखवण्यास आणले होते. मात्र पालकमंत्र्यांनी ते सोयाबीन न पाहिल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. व त्यावेळी यांच्यासोबत उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ओमराजे निंबाळकर आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
काय म्हणाले होते खासदार
नुकसानीच्या मदतीचे सांगू नको सोयाबीनचे भाव किती कमी झाले. ते पहा असे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सुनावले व नंतर ऐ जास्त बोलू नको असे म्हणाल्याने .
काय म्हणून केला जातोय खासदार यांच्या वाक्याचा निषेध
भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक होत. खासदारांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दम देत अरेरावी ची भाषा वापरणे योग्य आहे का? असे म्हणत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाक्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निषेध व्यक्त करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा