Salman Khan Snake Bite | सलमान खानला चावला साप | साप चावल्यावर काय करावेत जाणून घ्या


 अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) उद्या वाढदिवस (Birthday) आहे आणि आज तो एका मोठ्या संकटातून वाचला. होय तुम्ही बरोबर वाचत आहे. सलमान खान खूप मोठ्या संकटातून वाचलाय. सलमान खानला त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊस येथे साप चावला (Snak). साप हा बिनविषारी असल्याने मोठा अनर्थ टळला. साप चावल्यानंतर सलमान खानला पहाटे नवी मुंबई मधल्या कामोठे परिसरातील एमजीएम (महात्मा गांधी मिशन) या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर सलमान खान ला सकाळी नऊ वाजता घरी सोडण्यात आले. सध्या सलमान खानची प्रकृती ठिक असल्याचे कळते. (Salman Khan Snake Bite)


साप चावल्यावर लगेच कोणते उपचार करावेत आणि साप विषारी आहे की बिनविषारी हे कसं ओळखायचं हे आपण जाणून घेऊया : 

1) साप चावल्यावर लगेच खचून न जाता संयम व धीर धरावा.

2) साप चावलेली जागा (जखम) स्वच्छ धुऊन घेतली पाहिजे.

3) जखम ज्या ठिकाणी झालीय, म्हणजे सापाने जिथे दंश केलाय त्या ठिकाणाहून शरीराकडे जाणाऱ्या धमन्या घट्ट बांधून घ्यावी. जेणेकरून शरीरात विष जास्त प्रमाणावर भिनणार नाही.

उदा. साप जर पायाच्या अंगठ्याला चावला असेल, तर गुडघ्याच्या खालचा भाग मिळेल त्याच्या मदतीने घटक बांधावा. म्हणजे शिरिरात रक्ताबरोबर विष पसरणार नाही.

4) सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे होईल तेवढे लवकर दवाखान्यात गेले पाहिजे.


साप विषारी की बिनविषारी हे कसं ओळखायचं 

1) विषारी साप चावला असेल तर, मळमळ होणे.

2) झोप लागणे किंवा झोप येणे.

3) सापाने जिथे दंश केला तो भाग काळा किंवा निळा पडला की तो साप विषारी असतो.

4) जर साप बिनविषारी असेल तर रक्तप्रवाह अधिक होतो साप चावल्याने त्याचा वन पडतो म्हणजे v आकाराची छाप पडते.


अशा महत्वपूर्ण आणि फायदेशीर माहितीसाठी आणि ब्रेकिंग न्यूज साठी आमच्या ब्लॉगला नेहमी भेट देत राहा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"लागिर झालं जी" मालिकेतील कलाकारांच्या जीवाला धोका; खळबळजनक पोस्ट करत दिली माहिती

बहुला येथे बायप संस्थेच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण व वंधत्व शिबीर संपन्न

Indurikar Maharaj On Nilesh Lanke : इंदुरिकर महाराजांचा निलेश लंकेना हत्तीचा उल्लेख करून सल्ला...