लग्न लावून देत नसल्याने पित्यावर कुऱ्हाडीने घाव ; रागाच्या भरात तरुणाने केलं गे कृत्य!

वाशिम, 06 नोव्हेंबर: वाशिम जिल्ह्यातील जऊळका याठिकाणी एका तरुणाने आपल्या वडिलांची निर्घृणपणे हत्या केली आहे. शुक्रवारी रात्री आरोपी मुलाने कुऱ्हाडीने वार करत आपल्या जन्मदात्या पित्याला संपवलं. याप्रकरणी जऊळका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाची चौकशी केली असता, हत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

धर्मा भारती असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव असून ते वाशिम जिल्ह्याच्या जऊळका येथील रहिवासी आहेत. तर प्रमोद भारती असं अटक केलेल्या मुलाचं नाव आहे. आरोपी मुलगा प्रमोद हा 27 वर्षांचा असून त्याला विविध प्रकारचे व्यसनं आहेत. आपला मुलगा काहीच काम करत नाही, तसेच त्याला विविध प्रकारची व्यसनं आहेत, त्यामुळे मृत वडील धर्मा हे मुलाचं लग्न लावून देत नव्हते. त्यामुळे प्रमोद याचा आपल्या वडिलांवर राग होता. याच रागातून प्रमोद याने आपल्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली आहे.
शुक्रवारी रात्री हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलाला जऊळका पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"लागिर झालं जी" मालिकेतील कलाकारांच्या जीवाला धोका; खळबळजनक पोस्ट करत दिली माहिती

बहुला येथे बायप संस्थेच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण व वंधत्व शिबीर संपन्न

Indurikar Maharaj On Nilesh Lanke : इंदुरिकर महाराजांचा निलेश लंकेना हत्तीचा उल्लेख करून सल्ला...