वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला पूर्ण अधिकार सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय | The Lokhit News

 


वडीलांच्या मृत्यूनंतर वडिलांच्या संपत्तीवरून भाऊ-बहिणींमध्ये अनेकदा वाद बघायला मिळतो. वडिलांची मालमत्ता वाटपावरून अनेकदा हा वाद कोर्टापर्यंत देखील जाताना आपण अनेकदा पाहतो. आणि अनेक वेळा भावा-बहिणींमध्ये वैर निर्माण होत ते ह्याचं संपत्तीच्या वादातून तर कधी भांडणे ही होताना आपण अनेकदा बघितलंय. मात्र हाच वाद आता कमी होताना दिसणार आहे. कारण तसा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. वडीलांच्या संपत्तीमध्ये मुलीला पहिला हक्क असेल असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.


सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय ?

"एकत्रित कुटुंबात राहत असणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू हा मृत्यूपत्र तयार न करता झाला असल्यास त्याच्या संपूर्ण मालमत्तेवर त्याची मुलगी उत्तराधिकारी असेल", "तसेच मुलींच्या चुलत भावांपेक्षा संपत्तीचा वाटा मुलीला देण्यास प्राधान्य दिलं जाईल. हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 लागू होण्यापूर्वीच्या संपत्ती वाटपाला ही अशीच व्यवस्था लागू होईल" असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल आहे. तमिळनाडू मधील एका खटल्याचा निकाल देताना न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आणि कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण 51 पानांचा निकाल दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'निलिट' मध्ये 25 नोव्हेंबर रोजी मोफत भव्य रोजगार मेळावा.

हेलिकॉप्टर अपघात बिपिन रावत यांच्यासह पत्नी मधुलिका रावत यांचे देखील अपघाती निधन

चारोळ्यातुन पंकजा मुंडेंचा भाजपाला घरचा आहेर