शेतकऱ्यांनाही आता CNG पंपासाठी डीलरशिप
नवीन व्यवसायासाठी सीएनजी पंप उभारणे हा सर्वोत्तम उपाय आहे. केंद्र सरकारने सीएनजी गॅस स्टेशन उभारण्यासाठी प्रोत्साहन योजना हाती घेतली आहे. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून सीएनजी पंप उभारून आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध करून दिला जात आहे. राजधानी दिल्लीसह प्रमुख राज्यांमध्ये सीएनजी पंप एजन्सी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राजधानी दिल्लीत सर्वाधिक सीएनजी पंप आहेत. इतर राज्यांमध्ये, सीएनजीच्या ऑनलाइन डीलरशिप प्रक्रियेला वेग आला आहे.
सीएनजी पंप उभारण्यासाठी आवश्यक पात्रता आणि अटी खालीलप्रमाणे आहेत-
अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
अर्जदाराचे शिक्षण किमान दहावी पूर्ण झालेले असावे.
अर्जदाराचे वय 21ते 55 दरम्यान असावे.
या सर्व अटींसह सीएनजी पंप उघडण्यासाठी अर्जदाराकडे स्वताची जमीन असणे आवश्यक आहे.
सीएनजी पंपासाठी किती जमीन उपलब्ध असावी?
सीएनजी पंप सुरू करण्यासाठी अर्जदाराकडे जमीन असणे ही मूळ अट आहे. तुमच्या मालकीची जमीन नसेल तर दुसऱ्या जमीन मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या जमिनीसाठी सीएनजी पंपासाठीही अर्ज करू शकता. तथापि, तुमच्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र आणि प्रतिज्ञापत्र सादर करणे खूप महत्वाचे असेल. मात्र, भाडेतत्त्वावरील जमिनीसाठी करारनामा असणे अत्यावश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्याकडे शेत जमीन असल्यास, तुम्हाला बिगर-शेतकी (NA) करणे आवश्यक आहे. जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि नकाशा सोबत असणे आवश्यक आहे.
सीएनजी पंपासाठी पूर्ण खर्च किती आहे?
सीएनजी पंप डीलरशिप/एजन्सी सुरू करण्यासाठी ते ठिकाण आणि कंपनीवर अवलंबून आहे. त्यासाठी किमान 30 ते 50 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी अर्जदाराकडे 15,000 ते 16,000 चौरस फूट जागा असणे आवश्यक आहे.
सीएनजी डीलरशिप किंवा एजन्सीचे लाभ :
आयकरात 5 वर्षांची सूट
सरकारी अनुदान
राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज
सीएनजी पंप डीलरशिप प्रदान करणाऱ्या कंपन्या –
इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड
हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन
महानगर गॅस लिमिटेड
गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया
महानगर नॅचरल गॅस लिमिटेड
इंडो-ब्राइट पेट्रोलियम प्रायव्हेट लिमिटेड
गुजरात स्टेट पेट्रोलियम प्रायव्हेट लिमिटेड
तुम्ही तुमचा ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर एका आठवड्याच्या आत तुम्हाला
रिप्लाय मिळेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा