केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत किनारी सुरक्षेबाबत सल्लागार समितीची बैठक
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली, आज नवी दिल्लीत किनारी सुरक्षा, मुख्य सल्लागार समिती बैठक. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि अजय मिश्रा, केंद्रीय गृह सचिव, मस्त्यपालन सचिव, भारतीय रक्षक दल आणि गृहमंत्रालयाच्या तटबंदी या बैठकीला उपस्थित होते.
गृहमंत्रालय किनारी सुरक्षेच्या बाबतीत येणाऱ्या आव्हानांचे गांभीर्याने अध्ययन करत आहे, असे अमित शाह यावेळी म्हणाले. या बैठकीत दिलेल्या सूचनांचा विचार करुन, सर्व राज्यांच्या मदतीने, किनारी सुरक्षा अभेद्य बनवण्यासाठी योग्य आणि आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत. पहिल्यांदाच भारतातील सर्व बेटांचे सर्वेक्षण केले जात आहे आणि या सर्वेक्षणानंतर मिळालेल्या अहवालांच्या आधारे अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत.किनारी सुरक्षेत अनेक मंत्रालये आणि यंत्रणांची भूमिका महत्वाची असते, असे सांगत, त्यांच्यात समन्वय निर्माण करून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सर्व हितसंबंधियांची बैठक घेऊन किनारी सुरक्षा अधिक मजबूत केली जाईल, असेही अमित शाह म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा