तू सैतानाचा अवतार; तुझा बळी द्यावा लागेल, तीला नग्न करून केले अघोरी कृत्य
बारामती: दोन दीर व सासूने एका ४० वर्षीय महिलेला ती सैतानाचा अवतार आहे असे सांगून अघोरी कृत्यासह नग्न करत तिचा गळा दाबून बळी देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार करंजे पूल (ता. बारामती) येथे घडला बारामती पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यासह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पीडित महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महेंद्र माणिकराव राजेंद्र माणिकराव गायकवाड, कौशल्या, ननंद नीता अनिल जाधव व तात्या नावाचा मांत्रिक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पीडित महिला पती दोन मुले दोन दीर सोबत एकत्रित राहते. महिलेचे पती नामवंत बँकेत उच्चपदस्य अधिकारी आहेत. महेंद्र व राजेंद्र हे महिलेचे दीर असून
कौशल्या या सासु आहेत. विवाहात हुंडा जादा दिला नाही, या कारणावरून सासू व दिराकडून तिचा छळ केला जात होता. नणंद माहेरी आल्यानंतर तिनेही त्यांची साथ दिली तात्या नामक मांत्रिकाला घरी बोलावले त्याने या अघोरी कृत्य करणे उपाशी ठेवणे असे प्रकार केले
● तू पांढऱ्या पायाची म्हणत केला छळ
○विवाहितेला मुलगी झाल्यानंतर सासूने तू पांडचा पायाची असून, आमच्या घरी राहू नको, असे म्हणत तिला हाकलून देण्याचा प्रयत्न केला.
○२५ ऑक्टोबरला दोन्ही दौर व सासू यांनी घरात कोणीही नसल्याचे पाहून तिला मारहाण केली. तू सैतानाचा अवतार आहे तुझा बळी देऊ असे म्हणत तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला
○त्याच दिवशी दीर व सासूने तात्या नामक मांत्रिकाला घरी बोलावले हल्दी-कुंकवाचे रिंगण करत. त्यात जिल्ला नग्न करून अघोरी कृत्य भाग पाडले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा