पोस्ट्स

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत किनारी सुरक्षेबाबत सल्लागार समितीची बैठक

इमेज
 केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली, आज नवी दिल्लीत किनारी सुरक्षा, मुख्य सल्लागार समिती बैठक. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि अजय मिश्रा, केंद्रीय गृह सचिव, मस्त्यपालन सचिव, भारतीय रक्षक दल आणि गृहमंत्रालयाच्या तटबंदी या बैठकीला उपस्थित होते. गृहमंत्रालय किनारी सुरक्षेच्या बाबतीत येणाऱ्या आव्हानांचे गांभीर्याने अध्ययन करत आहे, असे अमित शाह यावेळी म्हणाले. या बैठकीत दिलेल्या सूचनांचा विचार करुन, सर्व राज्यांच्या मदतीने, किनारी सुरक्षा अभेद्य बनवण्यासाठी योग्य आणि आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत. पहिल्यांदाच भारतातील सर्व बेटांचे सर्वेक्षण केले जात आहे आणि या सर्वेक्षणानंतर मिळालेल्या अहवालांच्या आधारे अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. किनारी सुरक्षेत अनेक मंत्रालये आणि यंत्रणांची भूमिका महत्वाची असते, असे सांगत, त्यांच्यात समन्वय निर्माण करून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सर्व हितसंबंधियांची बैठक घेऊन किनारी सुरक्षा अधिक मजबूत केली जाईल, असेही अमित शाह म्हणाले. बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली आणि किनारी ...

सासरी जाण्यास केला उशीर, पत्नीचा खून

इमेज
शिराढोण (जि. उस्मानाबाद): माहेरी आलेल्या विवाहितेने सासरी जाण्यास एक दिवस विलंबाची मागणी केली असता पतीने थेट विळ्याने वार करून पत्नीचा खून केला. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली याप्रकरणी शिरढोण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरढोण येथील मारुती माने यांनी जालना जिल्ह्यातील मांजरगाव येथील कृष्णा जाधव याच्याशी त्यांची मुलगी काजल हीचा विवाह करून दिला होता. संसार सुरळीत सूरू असताना मागील सप्टेंबर महिन्यात काजल ही आजारी पडली होती त्यामुळे तिच्या पतीने औषधोपचारासाठी तिला माहेरी सोडले तेव्हापासून ती शिराढोणमध्येच होती. यानंतर २० सप्टेंबर रोजी काजलचा पती कृष्ण हा तिला घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरी शिरढोण येथे आला होता त्यादिवशी मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कृष्णाने सकाळीच निघायचा आग्रह केला होता. तेव्हा काजल व तिची आई यांनी उद्याचा एक दिवस मुक्काम करूयात अशी चर्चा केली. यानंतर शुक्रवारी दुपारी सराफा दुकानातून काही दागिने खरेदी केल्या नंतर कृष्णा व काजल घराकडे परतले तेव्हा घरी कोणी नसल्याने आरोपी कृष्णाने संधी साधत आजच सासरी का नबी येत यावरुन वाद घातला आणि काजल ला स्टीलच्या...

तू सैतानाचा अवतार; तुझा बळी द्यावा लागेल, तीला नग्न करून केले अघोरी कृत्य

इमेज
बारामती: दोन दीर व सासूने एका ४० वर्षीय महिलेला ती सैतानाचा अवतार आहे असे सांगून अघोरी कृत्यासह नग्न करत तिचा गळा दाबून बळी देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार करंजे पूल (ता. बारामती) येथे घडला बारामती पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यासह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पीडित महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महेंद्र माणिकराव राजेंद्र माणिकराव गायकवाड, कौशल्या, ननंद नीता अनिल जाधव व तात्या नावाचा मांत्रिक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पीडित महिला पती दोन मुले दोन दीर सोबत एकत्रित राहते. महिलेचे पती नामवंत बँकेत उच्चपदस्य अधिकारी आहेत. महेंद्र व राजेंद्र हे महिलेचे दीर असून कौशल्या या सासु आहेत. विवाहात हुंडा जादा दिला नाही, या कारणावरून सासू व दिराकडून तिचा छळ केला जात होता. नणंद माहेरी आल्यानंतर तिनेही त्यांची साथ दिली तात्या नामक मांत्रिकाला घरी बोलावले त्याने या अघोरी कृत्य करणे उपाशी ठेवणे असे प्रकार केले ● तू पांढऱ्या पा...

उस्मानाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री शंकरराव गडाख यांच्या उस्मानाबाद दौऱ्यात गोंधळ

इमेज
  उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली आहे. उस्मानाबाद: पालकमंत्री शंकरराव गडाख हे उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान कळंब तालुक्यातील बहुला या गावात कोल्हापुरी बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री आले होते. त्याच वेळी उस्मानाबाद जिल्ह्यात  अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची देखील ते पाहणी करत होते. मात्र सरकारने जाहीर केलेली मदत हि तुटपुंजी आहे असे सांगण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आले होते .त्यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता सत्कार स्वीकारण्यात व्यस्त राहिल्याने. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना नुकसान झालेले सोयाबीन दाखवण्यास आणले होते. मात्र पालकमंत्र्यांनी ते सोयाबीन न पाहिल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. व त्यावेळी यांच्यासोबत उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ओमराजे निंबाळकर आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्...

आता फळापासून होणार बँडेजची निर्मिती

इमेज
जखमांचे व्रण भरून काढण्यासाठी बँडेज फार महत्त्वाचे असते. रुग्णालये, वैद्यकीय आस्थापने, औषध विक्रेत्यांची दुकाने या ठिकाणी नेहमीच कापसापासून बनवलेल्या बँडेजेसचा वापर केला जातो. मात्र, आता फळांच्या कचयापासून अँटिबॅक्टोरियल बँडेजची निर्मिती करण्यात आली आहे. या बँडेजचा शोध सिंगापूरमधील नानयां टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने लावला आहे. फळांच्या कचयापासून बँडेजची निर्मिती करण्यासाठी ड्युरियन या फळाचा वापर करण्यात आला आहे. ड्युरियन हे फळ सिंगापूरमध्ये खूप खाल्ले जाते. दरवर्षी सव्वा कोटी नागरिक या फळाचा वापर करतात. ड्युरियनचा गर खाल्ला जातो. मात्र, त्याच्या बिया आणि आवरण फेकून दिले जाते. या आवरणापासूनच अटिबॅक्टोरियल बँडेजची निर्मिती करण्यात आली आहे. नेहमीच्या वापरातील बँडेजच्या तुलनेत हे नवीन बँडेज गुणकारी आहे. हायड्रोजेल बँडेज असल्याने ते नरम असते. या बँडेजमुळे जखमा लवकर भरून निघतात, असा निष्कर्ष निघाला आहे. इतर बँडेजच्या तुलनेत हे नवे बँडेज स्वस्तही आहे. शिवाय फळाच्या आवरणापासून तयार केले जात असल्याने त्याचे विघटनही लवकर होते. ● अशी होते निर्मिती १) ड्युरियन फळाच्य...

भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजर

इमेज
  भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र मंडळातर्फे 9 ते 16 ऑक्टोबर 2021 या कालावधीत राष्ट्रीय टपाल सप्ताह आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा बर्न येथे मुख्यालय असलेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियन या संघटनेच्या  स्थापनेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी दर वर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिवस साजरा केला जातो. भारतीय टपाल मंडळाच्या वतीने 9 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर 2021 या कालावधीत राष्ट्रीय टपाल सप्ताह आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल एच.सी.अग्रवाल यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेचे आयोजन केले होते. राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांबद्दल  तसेच टपाल विभागाच्या विविध सेवांबाबत महाराष्ट्र मंडळाने  केलेल्या कामगिरीची माहिती यावेळी देण्यात आली. टपाल खात्याच्या अर्थ विभागाचे महाव्यवस्थापक विजय कुमार तसेच  महाराष्ट्र विभागाच्या टपाल सेवा संचालक कैय्या अरोरा हे  देखील या वार्ताहर परिषदेला उपस्थित होते. राष्ट्रीय टपाल सप्ताह आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांमध्ये...

नागराजच्या नवीन सिनेमाचा टिझर लाँच

इमेज
मुंबई -राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचया 'आटपाट' प्रोडक्शन ने नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. फँड्री, सैराट, पिस्तुले, नाळ अश्या चित्रपटानंतर आता नागराज "घर बंदूक बिर्याणी" हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात स्वतः नागराज भूमिका करणार असून 'सैराट' फेम आकाश ठोसर आणि प्रसिध्द अभिनेता सयाजी शिंदे यांच्याही यात मुख्य भूमिका आहेत. नागराजने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाचा टिझर प्रसिध्द केला आहे. केवळ टेक्स्ट आणि व्हाईस ओव्हर असलेल्या या टिझरमध्ये चित्रपटाचे शीर्षक ''घर- बंदूक- बिरयानी'' ठळक दाखवण्यात आले आहे. एका गुढ संगीताने टिझरची सुरूवात होते. झी स्टुडिओज आणि नागराजची हा चित्रपट संयुक्त निर्मिती असणार आहे. या चित्रपटाचे संगीतकार आहेत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र. त्यांनी यापूर्वी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे. २०२२ मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये झळकणार आहे.