नागराजच्या नवीन सिनेमाचा टिझर लाँच
मुंबई -राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचया 'आटपाट' प्रोडक्शन ने नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. फँड्री, सैराट, पिस्तुले, नाळ अश्या चित्रपटानंतर आता नागराज "घर बंदूक बिर्याणी" हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात स्वतः नागराज भूमिका करणार असून 'सैराट' फेम आकाश ठोसर आणि प्रसिध्द अभिनेता सयाजी शिंदे यांच्याही यात मुख्य भूमिका आहेत.
नागराजने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाचा टिझर प्रसिध्द केला आहे. केवळ टेक्स्ट आणि व्हाईस ओव्हर असलेल्या या टिझरमध्ये चित्रपटाचे शीर्षक ''घर- बंदूक- बिरयानी'' ठळक दाखवण्यात आले आहे.
एका गुढ संगीताने टिझरची सुरूवात होते. झी स्टुडिओज आणि नागराजची हा चित्रपट संयुक्त निर्मिती असणार आहे. या चित्रपटाचे संगीतकार आहेत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र. त्यांनी यापूर्वी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे. २०२२ मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये झळकणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा