आता फळापासून होणार बँडेजची निर्मिती
जखमांचे व्रण भरून काढण्यासाठी बँडेज फार महत्त्वाचे असते. रुग्णालये, वैद्यकीय आस्थापने, औषध विक्रेत्यांची दुकाने या ठिकाणी नेहमीच कापसापासून बनवलेल्या बँडेजेसचा वापर केला जातो. मात्र, आता फळांच्या कचयापासून अँटिबॅक्टोरियल बँडेजची निर्मिती करण्यात आली आहे.
या बँडेजचा शोध सिंगापूरमधील नानयां टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने लावला आहे. फळांच्या कचयापासून बँडेजची निर्मिती करण्यासाठी ड्युरियन या फळाचा वापर करण्यात आला आहे. ड्युरियन हे फळ सिंगापूरमध्ये खूप खाल्ले जाते. दरवर्षी सव्वा कोटी नागरिक या फळाचा वापर करतात.
ड्युरियनचा गर खाल्ला जातो. मात्र, त्याच्या बिया आणि आवरण फेकून दिले जाते. या आवरणापासूनच अटिबॅक्टोरियल बँडेजची निर्मिती करण्यात आली आहे. नेहमीच्या वापरातील बँडेजच्या तुलनेत हे नवीन बँडेज गुणकारी आहे. हायड्रोजेल बँडेज असल्याने ते नरम असते.
या बँडेजमुळे जखमा लवकर भरून निघतात, असा निष्कर्ष निघाला आहे. इतर बँडेजच्या तुलनेत हे नवे बँडेज स्वस्तही आहे. शिवाय फळाच्या आवरणापासून तयार केले जात असल्याने त्याचे विघटनही लवकर होते.
● अशी होते निर्मिती
१) ड्युरियन फळाच्या साल विलग केले जाते.
२) हे साल वाळवले जाते. त्यानंतर वाळलेल्या सालाची पावडर केली जाते. युनिव्हर्सिटीचा दावा आहे.
३) या पावडरमध्ये ग्लिसरॉलचे मिश्रण टाकून त्याचे अँटिबॅक्टोरियल पट्ट्यांमध्ये रुपांतर केले जाते.
४) नंतर त्याचे तुकडे करून बँडेज तयार केले जाते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा