प्रसून जोशी यांना 2021चा भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व पुरस्कार प्रदान
“एक आसमान कम पड़ता है, और आसमान मंगवा दो, है बेसब्रा उड़ने में , मेरे पंख नीले रंगवा दो, स्वप्न करोड़ों सत्य हो रहे है , अब उन का सत्कार करो, निकल पड़ा है भारत मेरा , अब तुम जयजयकार करो. प्रसून जोशी काल गोवा येथे झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात सुप्रसिध्द गीतकार प्रसून जोशी यांना यंदाचे “भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व- 2021’’ हा पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यानंतर जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले . चित्रपट क्षेत्राबरोबरच संस्कृती आणि सामाजिकदृष्टीने महत्वपूर्ण कलात्मक कार्यामध्ये प्रसून जोशी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा प्रतिष्ठित सन्मान देऊन गौरव करण्यात आला. प्रसून जोशी यांनी विविध चित्रपटांसाठी गीतलेखन केले असून त्यांची काही गीत खूप गाजली. यामध्ये तारे जमीं पर, रंग दे बसंती, हम तुम, फना, आकर्षण, दिल्ली 6, गजनी, नीरजा, मनकर्णिका या चित्रपटांचा समावेश आहे. अनेक चित्रपटांमधली जोशी यांची गाणी लोकप्रिय ठरली आहेत.यावेळी त्यांनी युवा कलाकारांना मनातील गोंधळालाही जपले जपण्याच...