महिला आयोगावर 'रावणाला मदत करणारी शूर्पणखा बसवू नका' चित्रा वाघ यांची रूपाली चाकणकरांवर टीका
महिला आयोगावर 'रावणाला मदत करणारी शूर्पणखा बसवू नका' चित्रा वाघ यांची रूपाली चाकणकरांवर टीका
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच नाव निश्चित झालं आहे. आणि आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याच बोलले जात आहे. मात्र त्याआधीच भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटरवरून चाकणकरांवर घणाघाती हल्लाबोल केलाय.
रावणाला मदत करणारी शूर्पणखा बसवू नका असा बोचरा वार भाजपच्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांचं नाव न घेता केला. जर रुपाली चाकणकरांची निवड झाली, तर प्रत्येक वेळी सरकारचे नाक कापलं जाईल असा सल्ला चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला दिला आहे.
नेमकं काय म्हटल्या चित्रा वाघ
महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत,
पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणे आहे,
अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल,
तर किमान रावणाला मदत करणारी 'शूर्पणखा' बसवू नका.
अन्यथा प्रत्येक वेळी सरकारचचं नाक कापलं जाईल.
चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर जेव्हा रूपाली चाकणकर यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी यासंदर्भात 'मला कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नसल्याचं म्हटल आहे'.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा