आम्हाला उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे दिसू लागले आहेत, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Nitesh Rane On Uddhav Thackeray
आम्हाला उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे दिसू लागले आहेत, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Nitesh Rane On Uddhav Thackeray
काल झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या भाषणानंतर भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर ट्विटर वरून टीका केली आहे.
काय म्हणाले नितेश राणे
आम्हाला आता उद्धवजींमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) स्पष्टपणे दिसू लागले आहे. दसरा मेळाव्या नंतर उद्धवजीं मध्ये आणि राहुल गांधी यांच्या आता अजिबात फरक उरला नाहीये. हे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो, यात कुठलीच शंका नाही अस ट्विट भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलंय.
उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात अनेक मुद्द्यांवर भाष्य
केल आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर आपल्या भाषणातून चांगलाच हल्लाबोल केला आहे. यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजप व देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकांवर भाजप कडून सुद्धा प्रत्युत्तर देण्यात आलं. मात्र आता नितेश राणे यांनी केलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेला शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते ते पहाणं महत्त्वाच असेल. चारोळ्यातुन पंकजा मुंडेंचा भाजपाला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा