भोगजी येथील महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
प्रतिनिधी कळंब तालुक्यातील आढाळा येथे अनेक दिवसापासून आढाळा गावाकडे जाणारे फिटर ला मंजुरी मिळून देखील फिटर वेगळे होत नसल्याने शेतकऱ्यांनी दि 30 आक्रमक पवित्रा घेत भोगजी येथील महावितरणच्या कार्यालयावर निवेदन देत आंदोलन केले. उस्मानाबाद: कळंब तालुक्यातील भोगजी येथुन आढाळा या गावाकडे जाणारे विजेचे फिटर वेगळे होण्याला मंजुरी मिळाली असून देखील प्रशासनाकडून त्यांचे काम होत नसल्याने. व पुर्वीच्या फिटर वर जास्त लोड होत असल्याने .त्या फिटर चा वारंवार बिघाड होत असल्याने. शेतीला पाणी देणे देखील अवघड झाले आहे .व त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवार दि ३० आक्रमक पवित्रा घेत भोगजी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. विजेचा वारंवार त्रास सहन करत होते मात्र बुधवारी शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा स्फोट झाला. आणि त्यांनी महावितरणच्या भोगजी येथील विद्युत केंद्रावर जाऊन आक्रमक होत आंदोलन केले सदर आंदोलनात फिटर वेगळे करून बाकीच्या गावा प्रमाणे वीजपुरवठा मिळावा अशी मागणी देखील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. वेळेवर मोटारीचे बिल नाही भरले तर कनेक्शन काढतात, मग विज बिल भरून देखील वीज का पुरती म...